शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धोनी भाजपात येणार का? भाजपा अध्यक्षांचं 'आनंदी' उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 17:21 IST

धोनीच्या भाजपा प्रवेशाबाबत संजय पासवान यांनी धोनीचे स्वागत असून तो लवकरच भाजपात सामिल होईल,

ठळक मुद्देधोनीच्या भाजपा प्रवेशाबाबत संजय पासवान यांनी धोनीचे स्वागत असून तो लवकरच भाजपात सामिल होईल, असे म्हटले होते.भाजपा नेते जेपी नड्डा यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडचा दौरा केला.

नवी दिल्ली - विश्वचषक स्पर्धेतून भारत बाहेर पडल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपात येणार असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पावसान यांनी केला होता. याबाबत धोनीशी अनेकदा चर्चा झाली असल्याचंही त्यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितलं. त्यानंतर, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी. नड्डा यांना धोनीच्या प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. 

धोनीच्या भाजपा प्रवेशाबाबत संजय पासवान यांनी धोनीचे स्वागत असून तो लवकरच भाजपात सामिल होईल, असे म्हटले होते. विशेष म्हणजे पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही धोनीची भेट घेतली होती. तर, टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीरनेही भाजपात अधिकृत प्रवेश करुन दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे गौतम गंभीर आज भाजपाकडून खासदारही आहे.  

भाजपा नेते जेपी नड्डा यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडचा दौरा केला. यावेळी, धोनीच्या प्रवेशाबाबत नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, धोनी भाजपात येत असेल तर त्याचे स्वागत आहे, असे नड्डा यांनी म्हटले. भाजपाकडून सदस्यता नोंदणी सुरू आहे. त्यामुळे धोनी भाजपात येत असेल तर आम्हाला आनंदच होईल, असेही नड्डा यांनी म्हटले. नड्डा हे रांची येथे भाजपा नेत्यांना कानमंत्र देण्यासाठी पोहोचल आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी पक्षाकडून मिशन 65+ ठेवण्यात आले आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या 82 जागांसाठी निवडणुका होत आहेत. सध्या भाजपाने भाजपाकडे 37 जागा आहेत. दरम्यान, धोनी सध्या भारतीय संघात खेळत असून विश्वचषकात त्याने महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र, भाजपा प्रवेशाबाबत धोनीने कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. 

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीBJPभाजपाJharkhandझारखंडElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा