शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येचे 'हे' राज्य भाजपला पुन्हा मिळेल की नाही? बोडोलँड पीपल्स फ्रंट बाहेर पडल्याचा बसू शकतो फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:18 IST

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही.

गुवाहाटी : आसाममध्ये पुन्हा भाजप व मित्रपक्षांना बहुमत मिळेल, असे आतापर्यंत दोन जनमत चाचण्यांच्या निष्कर्षातून दिसून आले आहे. प्रत्यक्ष भाजपलाही आपलेच सरकार येण्याची खात्री वाटत आहे. तरीही गेल्या महिन्याभरात झालेल्या काही राजकीय बदलांमुळे गाफिल राहून चालणार नाही, हेही भाजप नेते ओळखून आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांत विधानसभेच्या १२६ पैकी भाजपला ६० जागा, तर मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेला १४ व बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ)ला १२ जागा मिळाल्या होत्या.  बीपीएफ आता भाजपसोबत नाही. तो काँग्रेसप्रणित महाआघाडीत आहे. गेल्यावेळी काँग्रेसला २६ आणि ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटला (एआययूडीएफ) १३ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा या दोघांची आघाडी नव्हती.  आता ती झाली असून, बीपीएफही सोबत आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी मुस्लिमच नव्हे, तर काही प्रमाणात हिंदूंमध्येही नाराजी आहे. त्यांनाही भारतीय असल्याचे पुरावे सादर करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी आहेत. याचा फटका भाजपला बसू शकेल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याविषयी नाराजी आहे. हिमांत बिस्वा सर्मा यांचे नाव पुढे करण्याचे भाजपने ठरवले होते. पण निवडणुकीआधी असे केल्यास पक्षातील गटबाजी उफाळून येईल, असे वाटल्याने भाजपने उमेदवारच जाहीर केलेला नाही. 

काँग्रेस आघाडीच्या जागांमध्ये वाढ?गेल्यावेळी भाजपला २९.५१, गण परिषदेला ८.१४ व बीपीएफला ३.९४ याप्रकारे तिघांना मिळून ४१.४९ टक्के मते मिळाली. याउलट स्वतंत्रपणे लढूनही काँग्रेसला ३०.९६, एआययूडीएफला १३.५ अशी ४४ टक्के मते मिळाली. त्यात आता बीपीएफची भर पडल्याने काँग्रेसप्रणीत आघाडीच्या जागांत खूप वाढ होईल, असा अंदाज आहे.  

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Assamआसाम