शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी करणार पोलिंग बुथप्रमाणे रचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 06:30 IST

निती आयोगाचे बैठकीत सादरीकरण

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना महासाथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांनी काय उपाययोजना आखल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत लसीकरण मोहिमेवरही चर्चा झाली. त्यात कोरोना प्रतिबंधक लस देशात समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदान केंद्राच्या धर्तीवर सर्वत्र लसीकरण केंद्रांची स्थापना केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीत कोरोना प्रतिबंधक लस नेमकी कधी उपलब्ध होणार, याबाबत ठोस काहीही सांगण्यात आले नसले तरी लसीकरण मोहिमेसंदर्भात निती आयोगाचे सदस्य  आणि कोरोना प्रतिबंध लस कृती दलाचे प्रमुख  डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक सादरीकरण केले. निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे मतदान केंद्रांची स्थापना केली जाते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्रे स्थापन केली जातील व या केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शीतकोठारांची साखळी अधिक मजबूत करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. ही शीतकोठारे कोविन ॲपशी संलग्न करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

अशी पाेहाेचेल लसn पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाईलn आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात प्राधान्यn लसीकरण केंद्रांची गटनिहाय स्थापनाn सरकारी आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर लसीकरण मोहिमेची जबाबदारी n मोहिमेशी संबंधित लोकांना प्रशिक्षित केले जाईलn जनसहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल

कोरोनाची सद्य:स्थिती

दिल्ली : दररोज सरासरी १११ बाधितांचा मृत्यूमहाराष्ट्र : दररोज सरासरी ९० बाधितांचा मृत्यू

लस येत नाही तोपर्यंत सर्वत्र कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNIti Ayogनिती आयोग