शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:49 IST

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान एका वसतिगृहावर कोसळले, या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणमुळे झाला? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समधून सर्व माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. पण, आता एक नवीन समस्या समोर आली आहे. या अपघातामध्ये या ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाले असून माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.

Aeroplane Black Box: 'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय? विमान अपघातानंतर सर्वात आधी का शोधतात याला – जाणून घ्या नेमकं काम 

विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा मानला जातो. या बॉक्समध्ये विमानातील सर्व घटना रेकॉर्ड केलेल्या असतात. यामुळे आता अहमदाबाद विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा आहे. यामुळे आता या ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळण्यासाठी बॉक्स अमेरिकेला पाठवला जाणार आहे. यासाठी तयारी सुरू केली आहे.

भारतीय अधिकारीही अमेरिकेला जाणार

अहमदाबाद विमान अपघातातून सापडलेला ब्लॅक बॉक्स आता डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेला पाठवला जाणार आहे. भारत सरकार लवकरच या प्रकरणावर निर्णय घेईल. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेल्या एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स वॉशिंग्टन डीसीला पाठवला जाईल, तिथे त्याची राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळात चौकशी केली जाईल. या ब्लॅक बॉक्ससोबत एक भारतीय टीम देखील पाठवली जाईल, ही टीम तपासादरम्यान सर्व प्रोटोकॉलचे निरीक्षण करणार आहे.

'ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?

जेव्हा एखादे विमान कुठेही कोसळते, तेव्हा प्रथम अपघाताचे कारण शोधले जाते. विमान अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक प्रशासन, सुरक्षा दल आणि अग्निशमन विभागासारख्या आपत्कालीन सेवा तेथे पोहोचतात. विमान अपघातानंतर, त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी ब्लॅक बॉक्स ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू ठरते.

विमान अपघातानंतर, त्याची चौकशी करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते. जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते. भारतात, या पथकांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात.

जेव्हा विमान अपघातात संपूर्ण विमान नष्ट होते, तर ब्लॅक बॉक्स कसा वाचतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण, अपघात कितीही मोठा असला तरी, ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही, कारण तो टायटॅनियमपासून बनलेला असतो आणि अपघातादरम्यानही तो सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठेवण्यासाठी तो एका मजबूत बॉक्समध्ये ठेवला जातो.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाGujaratगुजरातAccidentअपघातAmericaअमेरिका