शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

LPG: घरगुती सिलिंडरमध्ये १४.२ किलोऐवजी फक्त १० किलो गॅस भरणार? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:06 IST

America Iran Israel War: अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर झाला असून संपूर्ण जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर झाला असून संपूर्ण जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या भारतातही एलपीजीचा तुटवडा निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात देशभरातील हॉटेल व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १४.२ किलोवरून १० किलो केले जाणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने यावर आता अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

 पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, "घरगुती एलपीजी सिलिंडरचे वजन कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. नागरिकांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. देशातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा सामान्यपणे सुरू आहे." मध्य पूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६० टक्के एलपीजी आयात करतो. त्यामुळे भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर काही प्रमाणात नियंत्रण आणले असून, घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सरकारने घरगुती सिलिंडरच्या वजनात घट करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशातील इंधन स्थितीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आश्वस्त केले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. "होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होणारी जहाजांची वाहतूक आव्हानात्मक झाली असली तरी, भारत आपल्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण आता २७ ऐवजी ४१ देशांकडून इंधन आयात करत आहोत." महत्त्वाचे म्हणजे, भारताकडे सध्या ५३ लाख मेट्रिक टन धोरणात्मक तेलसाठा असून तो ६५ लाखांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. तसेच देशांतर्गत एलपीजीचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. इंधन आयातीसाठी केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता इतर देशांकडूनही पुरवठा सुनिश्चित केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No reduction in LPG cylinder weight: Government clarifies rumors.

Web Summary : Government denies reducing domestic LPG cylinder weight from 14.2 kg to 10 kg amid supply concerns. Ample fuel reserves exist; citizens should disregard misinformation. The government is diversifying fuel import sources and increasing domestic production.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईWarयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल