शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:14 IST

सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना फाटलेल्या जुन्या १० रुपयांच्या नोटांचे फोटो सापडले आहेत.

आतापर्यंत प्रेमत्रिकोण मानल्या जाणाऱ्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येमागे धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने आता एक नवीन वळण घेतले आहे, ज्यात सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंदूर गुन्हे शाखेने गोविंदला चौकशीसाठी बोलावले असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचे मूळ हवाला व्यवसायात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे. यामुळे राजा रघुवंशी यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद झाले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना फाटलेल्या जुन्या १० रुपयांच्या नोटांचे फोटो सापडले होते. हे फोटो हवाला व्यवहारात पुरावा म्हणून वापरले जात असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनुसार, हे फोटो हवाला नेटवर्कमधील 'कोडवर्ड' होते, ज्यांच्या मदतीने लाखो रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते.

चौकशीदरम्यान, राज कुशवाहाने सोनम आणि गोविंद रघुवंशी यांच्यासोबत हवाला व्यवसायात सामील असल्याची कबुली दिली आहे. या नोटांच्या छायाचित्रांमुळे केवळ हवाला कनेक्शनची पुष्टी झाली नाही, तर आर्थिक गुन्हेगारीच्या या खोलवरच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. तपासात असेही समोर आले आहे की, सोनम आणि गोविंद यांनी त्यांचे नातेवाईक जितेंद्र रघुवंशी यांच्या बँक खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार केले आहेत. काही खात्यांमध्ये तब्बल १४ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि पैसे काढल्याचे पुरावे सापडले आहेत.

मनी लाँड्रिंगच्या दिशेने ईडीचा तपासइंदूर गुन्हे शाखेने हवालाशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि रोख व्यवहारांची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सोपवली आहे. ईडी आता या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून सखोल चौकशी करणार आहे. गोविंद रघुवंशी यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून, त्यांचा प्लायवूड आणि लॅमिनेशन व्यवसाय, श्री बालाजी अॅक्टोरियो, हा हवाला रॅकेटचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

पोलिसांनी गोविंदच्या ऑफिस आणि गोदामाची झडती घेतली असून, तिथून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, गोविंदच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे, जेणेकरून हवाला नेटवर्कमधील त्यांची भूमिका निश्चित करता येईल. गोविंदने सोनमशी संबंध तोडल्याची घोषणा केली असली तरी, पोलीस त्याच्या व्यावसायिक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राजा रघुवंशी यांच्या हत्येचे रहस्य आता हवाला व्यवसायाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार