शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
5
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
6
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
7
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
8
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
9
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
10
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
12
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
13
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
14
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
15
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
16
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
17
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
18
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
19
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
20
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

विकली राऊंड..... क्राईम गुन्हेगाराचे वय १८

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खो

जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खोलवर रुजतात. खोड कसे तयार होते, याची अनेक कारणे आहेत. घटस्फोट,आई-वडिलांमध्ये आलेला दुरावा, अनाथ मुलांना न मिळालेला आसरा, व्यसनाधिनता, मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष, पाचवीला पुजलेले दारिद्रय, कमी कष्टात पैसा मिळविण्याचा हव्यास अशी एक ना अनेक कारणे यामध्ये दडलेली आहेत. गुन्हा घडल्यानंतर अशा भावनिक गोष्टींबाबत कायदा कधीच विचार करीत नसतो. गुन्ह्याप्रमाणे शिक्षा होते. मात्र या तरुणांचे पुढे काय ? याचा समाज फारसा विचार करीत नाही. ट्र्रक चालकांना लुटणारी टोळी, वाळू तस्करी, तरुणांचे खून पाडणारे हे कोणी सराईत गुंड नव्हे, तर साधे-सुधे तरूण आहेत. त्यांच्यामध्ये अशी खुनशी वृत्ती का निर्माण होते? याचा विचार करण्यापूर्वीच ते चतुर्भज होतात. आपला तरुण मुलगा कुठे जातो, काय करतो, कोठून पैसे आणतो, घरातून पैसे न देताही तो चैनीच्या वस्तू, मौज-मजा करतो, हे आपल्या मुलांना विचारण्याचे धाडस पालकांमध्ये नसल्यानेच गुन्हेगारीचे वय १८ च्या आत येऊ लागले आहे. यासाठी प्रबोधनापेक्षाही पालकांचा आणि कायद्याचा धाक हवा आहे. गुन्ह्यांचा तपास वेगाने झाला, शिक्षा एक वर्षाच्या आत लागली तरच कायद्याचा आणि पोलिसांचाही धाक निर्माण होईल. पोलिसांची तपास प्रक्रिया वेळकाढू आणि लांबणारी असेल तर एकामागून एक नवे गुन्हेगार तयार होतील. तरुणांच्या टोळ्यांचा पोलिसांनी आधीच बंदोबस्त केला, तरच गुन्हेगारीच्या जाळ्यात तरुण अडकणार नाहीत. गुन्हेगारीपासून परावृत्त करणारी पर्यायी व्यवस्था नसणे जेवढी खेदजनक तेवढीच गंभीर आणि समाजासाठी घातक ठरणार आहे.