"साहेब, मला वाचवा... माझी पत्नी गरम चिमट्याने मारतेय"; तक्रार ऐकताच पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:52 IST2022-11-14T12:44:45+5:302022-11-14T12:52:01+5:30

पीडित पतीने त्याची पत्नी त्याच्यावर किती अन्याय करते हे रडून रडून पोलिसांना सांगितलं आहे.

wifet hrashed husband hot tongs dispute police station hamirpur up | "साहेब, मला वाचवा... माझी पत्नी गरम चिमट्याने मारतेय"; तक्रार ऐकताच पोलीस हैराण

फोटो - आजतक

पती-पत्नीमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींवरून नेहमीच वाद होत असतात. कधी कधी हे वाद टोकाला देखील जातात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये ही घटना घडली असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एक व्यक्ती अचानक रडत रडत पोलीस ठाण्यात आला. "साहेब, मला वाचवा... माझी पत्नी गरम चिमट्याने मला मारते" असं म्हणत पोलिसांकडे मदत मागितली आहे. त्याने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पठाणपुरा परिसरात राहणाऱ्या संजय याने आपल्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्याकडे एक कार आहे. पण त्याच्या पत्नीला ती कार विकून ते पैसे आपल्या माहेरच्या लोकांना द्यायचे आहेत. संजयने कार विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यानंतर पत्नीने त्याला गरम चिमट्याने बेदम मारहाण केली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पती-पत्नीत नेहमीच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होतात. 

घरामध्ये दोघं नेहमीच विविध कारणांवरून भांडण करत असल्याचं देखील म्हटलं आहे. पीडित पतीने त्याची पत्नी त्याच्यावर किती अन्याय करते हे रडून रडून पोलिसांना सांगितलं आहे. तसेच असंही म्हटलं आहे. त्याने पत्नीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.  पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: wifet hrashed husband hot tongs dispute police station hamirpur up