शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

फेक फेसबूक प्रोफाइलवरून पत्नीने कंपनीत पाठवले अश्लील फोटो, पतीची गेली नोकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:52 IST

पत्नीने फेक फेसबूक अकाऊंट सुरू करून पतीच्या कंपनीतील बॉस आणि सहकाऱ्यांना अश्लील फोटो पाठवल्याने पतीला नोकरी गमवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुडगाव - पत्नीने फेक फेसबूक अकाऊंट सुरू करून पतीच्या कंपनीतील बॉस आणि सहकाऱ्यांना अश्लील फोटो पाठवल्याने पतीला नोकरी गमवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरगावमध्ये राहणाऱ्या या पती-पत्नीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर सध्या न्यायलयात सुनावणी सुरू आहे. याचदरम्यान आपल्या पत्नीने खोट्या फेसबूक अकाऊंटचा वापर करून अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप पतीने केला आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात आरोप योग्य असल्याचे समोर आल्यानंतर सेक्टर - 18 ठाणा पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अभिषेक नावाचा तरुण 2014 पासून गुडगावमधील एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याआधी 2011 साली त्याचा विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर काही दिवसांनीच पती पत्नीमध्ये  धुसफूस सुरू झाली. सध्या हे पती पत्नी विभक्त राहत असून, त्यांच्यामध्ये घटस्फोटाचा खटला चालू आहे. दरम्यान, 2016 साली अभिषेकच्या पत्नीने त्याच्या नावाने खोटे फेसबूक अकऊंट बनवले. त्यावर त्याचा फोटोही लावला. त्यानंतर या अकाऊंटवरून अभिषेकच्या कंपनीतील सहकाऱ्यांना आणि बॉसला अश्लील फोटो पाठवले. या प्रकारामुळे अभिषेकला कामावरून काढून ठाकण्यात आले. त्यानंतर अभिषेकने  पोलिसांत धाव घेऊन तक्रार केली. दरम्यान, प्राथमिक तपासात तक्रार खरी असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित तरुणाच्या पत्नीविरोधात आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सेक्टर -18 पोलीस ठाण्याचे एसएचओ चंद्रप्रकाश यांनी सांगितले.   

टॅग्स :Crimeगुन्हाcyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुकFamilyपरिवारnewsबातम्या