बेडरूममध्ये लपला होता पत्नीचा प्रियकर! पतीचा डोळा लागताच केला खून
By Admin | Updated: April 23, 2017 14:24 IST2017-04-23T14:07:44+5:302017-04-23T14:24:51+5:30
पती आणि पत्नीच्या नात्यात कुण्याच तिसऱ्याची एंट्री झाली की त्याचा शेवट वाईटच होतो. बिहारमधील खगडिया येथे

बेडरूममध्ये लपला होता पत्नीचा प्रियकर! पतीचा डोळा लागताच केला खून
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 23 - पती आणि पत्नीच्या नात्यात कुण्याच तिसऱ्याची एंट्री झाली की त्याचा शेवट वाईटच होतो. बिहारमधील खगडिया येथे पती पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. काल रात्री येथे एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे.
खगडिया जिल्ह्यातील बारुण गावात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीची पत्नी चंद्रिका देवी हिचे दीपक कुमार या व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते. याची कुणकुण त्याला लागल्यावर त्याने पत्नीला हे संबंध तोडून टाकण्यास सांगितले. पण तिने मात्र पतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून प्रियकराच्या साथीने पतीचा काटा काढण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे या महिलेचा प्रियकर बेडरूममध्ये येऊन लपला.
त्यानंतर या महिलेच्या पतीला झोप आल्यावर ती महिला आणि तिच्या प्रियकराने विटा आणि दगडांनी त्याला मारहाण करून त्याला ठार मारले. पोलिसांनी या महिलेला तात्काळ अटक केली. या महिलेला दोन मुलगे आणि दोन मुली अशी चार अपत्ये आहेत. दरम्यान, या महिलेचा प्रियकर दीपक कुमार घटना घडल्यापासून फरार झाला आहे.