शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 20:43 IST

एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले.

ठळक मुद्देसंशयी स्वभावाच्या पतीकडून भाजीविक्रेत्याची हत्या आरोपीनं भाजीविक्रेत्याचं मुंडकंच छाटलं

जयपूर - राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यामध्ये एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले. लक्ष्मण सिंह (48 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या भाजीवाल्याचं नाव आहे. तर नैना सिंह (27 वर्ष) असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस घटनास्थळावरुन अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैना सिंहनं कालादेह परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण सिंहची हत्या केली. लक्ष्मण सिंह हा भाजीविक्रेता होता. घटना घडल्याच्या दिवशी लक्ष्मण सिंह आरोपीच्या घराबाहेर उभे राहून भाजी विकत घेण्यासाठी आवाज देऊ लागला. तेव्हा आरोपी नैना घराबाहेर आला आणि त्यानं लक्ष्मणच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत त्याचे डोकं उडवलं. पहिला वार त्याच्या कानाजवळ केला आणि दुसरा वार थेट त्याच्या गळ्यावर करत त्याचे डोकं धडापासून वेगळं केले. 

शंकेखोर स्वभावाचा होता आरोपीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नैना सिंहचा स्वभाव फार संशयी होता. भाजीविक्रेत्यासोबत आपली पत्नी हसून बोलल्याचे त्याला अजिबात पटले नाही. याच रागाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुडकंच उडवलं. शिवाय, त्याला स्वतःच्या घरातही कोणी आले-गेलेले आवडायचे नाही.  दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :MurderखूनRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी