पतीच्या मारहाणीत पत्नी जखमी
By admin | Updated: December 25, 2014 23:30 IST
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड मारल्यामुळे त्याची पत्नी सुरेखाच्या डोळ्याजवळ जबर दुखापत झाली. इमामवाडा पोलिसांनी सुरेखाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
पतीच्या मारहाणीत पत्नी जखमी
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड मारल्यामुळे त्याची पत्नी सुरेखाच्या डोळ्याजवळ जबर दुखापत झाली. इमामवाडा पोलिसांनी सुरेखाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. ----