अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:49 IST2025-07-19T12:48:51+5:302025-07-19T12:49:19+5:30
एका महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक पत्नीने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन हरिद्वार ते मोदीनगर कावड यात्रा केली आहे.

फोटो - zeenews
श्रावण महिन्यातील पवित्र कावड यात्रेत सहभागी होऊन लाखो भाविक गंगाजल घेण्यासाठी पायी हरिद्वारला जातात. याच दरम्यान एका महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक पत्नीने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन हरिद्वार ते मोदीनगर कावड यात्रा केली आहे. हे दृश्य पाहून सर्वजण भावूक होत आहेत. १७० किमी प्रवास करणारे हे पती-पत्नी अत्यंत गरीब आहे. पतीची प्रकृती सुधारण्यासाठी पत्नी सतत प्रार्थना करत आहे.
आशा आणि सचिन अशी या पती-पत्नींची नावं आहेत. सचिनने दिलेल्या माहितीनुसार, १३ वेळा पायीप्रवास करत कावड यात्रा केली आहे, परंतु यावेळी शरीर साथ देत नाही. एक वेळ अशी होती जेव्हा मी या मार्गावर माझ्या पायावर चालत होतो, आज मी माझ्या पत्नीच्या खांद्यावरून हा प्रवास करत आहे. सर्वांनाच पत्नीच कौतुक वाटत आहे.
प्रेमप्रकरणामुळे पतीची हत्या करणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत असताना पतीवर जीवापाड प्रेम करणारी आशा त्याच्यासाठी वाटेल ते करत आहेत. पतीला पाठीवर घेऊन कावड यात्रा करत आहे. "माझी एकच इच्छा आहे की, भोलेनाथ यांनी माझ्या पतीला पूर्वीसारखं निरोगी करावं. पतीची सेवा करणं हेच एकमेव फळ आहे, बाकी सर्व काही व्यर्थ आहे" असं आशा म्हणते.
आशाचं समर्पण, श्रद्धा आणि पतीवरचं प्रेम लोकांना आश्चर्यचकित करण्यासोबतच भावुक करत आहे. या कावड यात्रेत या जोडप्यासोबत त्यांची दोन लहान मुलं देखील आहेत जी त्यांच्या पालकांच्या या प्रवासाचे साक्षीदार आहेत. हे कुटुंब आता हरिद्वारहून मोदीनगरला जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आशा तिच्या पतीला खांद्यावर घेऊन मुझफ्फरनगरमधील शिव चौकात पोहोचली तेव्हा लोकांची मोठी गर्दी जमली. लोकांनीही यांना प्रोत्साहन दिलं आहे.