हायव्होल्टेज ड्रामा! हॉटेलमध्ये पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, चपलेने धू धू धुतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:28 IST2022-09-20T17:19:25+5:302022-09-20T17:28:47+5:30
पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करत असतानाच अचानक पत्नी तिथे पोहोचली आणि तिने त्या दोघांना रंगेहाथ पकडलं.

हायव्होल्टेज ड्रामा! हॉटेलमध्ये पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, चपलेने धू धू धुतलं
उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एका महिलेने आपल्या पतीला बेदम मारल्याची घटना समोर आली आहे. पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करत असतानाच अचानक पत्नी तिथे पोहोचली आणि तिने त्या दोघांना रंगेहाथ पकडलं. पतीला पाहून पत्नी संतापली. रागाच्या भरात तिने चपलेने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने पतीसोबत असलेल्या महिलेला देखील चपलेने मारहाण केली. दिल्ली गेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी रोड येथे वास्तव्यास असलेला दिनेश रुग्णालयात काम करतो. दिनेशचे एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप त्याची पत्नी निलमने केला आहे. या दोघांच्या संबंधांबाबत समजताच पती-पत्नीचे घरात वाद होऊ लागले. पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून निलम माहेरी निघून गेली. पती एका महिलेसोबत दिल्ली गेट परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याचं निलमला समजलं.
निलमने आपल्या भावंडांसोबत ते हॉटेल गाठलं. तिथे एका खोलीत दिनेश दुसऱ्या महिलेसोबत होता. त्याला पाहून निलम खूप संतापली. तिने चप्पल काढून दिनेशला मारण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत असलेल्या महिलेलादेखील तिने चपलेनं चोपलं. याच दरम्यान दिनेश पत्नी निलमची माफी मागताना दिसत होता. हॉटेलमध्ये काही तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता.
'माझी चूक झाली. यावेळी मला माफ कर' अशा शब्दांत दिनेश माफी मागत आहे. तर दिनेशसोबत असलेली दुसरी महिलादेखील माफी मागताना दिसत आहे. 'यापुढे असं होणार नाही. माफ करा' असं ती व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते हॉटेलात पोहोचले. दिनेश आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.