केजरीवालांच्या हट्टापायी यादव व भूषण यांची 'विकेट' - मयांक गांधी

By Admin | Updated: March 5, 2015 15:40 IST2015-03-05T14:05:54+5:302015-03-05T15:40:25+5:30

योगेंद्र यादव व प्रशांत भूषण राजकीय व्यवहार समितीमध्ये असतील तर मी संयोजकपदाचा राजीनामा देईल अशी धमकी अरविंद केजरीवाल यांनी दिली होती असा दावा आपचे नेते मयांक गांधी यांनी केला आहे.

'Wicket' of Kejriwal's Haat Pai Yadav and Bhushan - Mayank Gandhi | केजरीवालांच्या हट्टापायी यादव व भूषण यांची 'विकेट' - मयांक गांधी

केजरीवालांच्या हट्टापायी यादव व भूषण यांची 'विकेट' - मयांक गांधी

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ५ - प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणले आहे. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण राजकीय व्यवहार समितीमध्ये (पीएसी) असतील तर मी संयोजकपदाचा राजीनामा देईल अशी धमकी अरविंद केजरीवाल यांनी दिली होती असा दावा आपचे नेते मयांक गांधी यांनी केला आहे.
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली होती. या बैठकीत योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पीएसीतून उचलबांगडी करण्यात आली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील आपने उघड केला नव्हता. मात्र आपचे नेते मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे या बैठकीचा तपशील जाहीर केला.  २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव व प्रशांत भूषण पीएसीमध्ये असतील तर पक्षाच्या संयोजकपदाचा राजीनामा देईन अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी स्वतःहूनच पीएसीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे मयांक गांधी यांनी म्हटले आहे. बैठकीतील चर्चेची वाच्यता बाहेर होऊ नये यासाठी केजरीवाल यांनी मला तोंड बंद ठेवायला सांगितले असा आरोपही त्यांनी केला आहे. 

Web Title: 'Wicket' of Kejriwal's Haat Pai Yadav and Bhushan - Mayank Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.