काश्मीरवरून वाक्युद्ध
By Admin | Updated: June 4, 2015 00:40 IST2015-06-04T00:40:57+5:302015-06-04T00:40:57+5:30
पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी आज काश्मीर प्रश्नावर खुले वक्तव्य केले असून, भारत-पाक फाळणीत अर्धवट सोडून दिले

काश्मीरवरून वाक्युद्ध
इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी आज काश्मीर प्रश्नावर खुले वक्तव्य केले असून, भारत-पाक फाळणीत अर्धवट सोडून दिलेला प्रश्न म्हणजे काश्मीर असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात राहिल बोलत होते. काश्मीर हा फाळणीतील न संपलेला प्रश्न आहे.
या भागात शांतता व स्थैर्य असावे असे आपण म्हणतो, पण आम्हाला संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मीर प्रश्न सोडवून पाहिजे. काश्मिरी जनतेच्या मतानुसार हा प्रश्न सुटला तर या भागात कायमची शांतता नांदेल, असा दावा त्यांनी केला. (वृत्तसंस्था)