शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मलिक यांचे राज्यपाल असताना मौन का हाेते? अमित शाह यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 06:06 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधील गैरप्रकारांबद्दल तेथील तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे काही माहिती होती, तर त्याबद्दल त्यांनी आपल्या कारकीर्दीत बोलायला हवे होते. मलिक आता जम्मू- काश्मीरच्या मुद्यांवर का बोलत आहेत, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. मलिक यांच्या दाव्यांची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.

सीआरपीएफच्या जवानांना हवाई प्रवासास केंद्र सरकारने अनुमती दिली नाही. त्यामुळे या जवानांना रस्त्याने प्रवास करावा लागला. त्यादरम्यान पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप मलिक यांनी नुकताच एका मुलाखतीत केला होता.  जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल  असताना दोन फाइल मंजूर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्याची काही जणांनी तयारी दाखविल्याचा आरोपही मलिक यांनी यापूर्वी केला हाेता.

‘काहीही दडविण्याची आवश्यकता नाही’सत्यपाल मलिक यांनी भाजपविरोधातील पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्याबाबत शाह म्हणाले की, मलिक हे दीर्घकाळ भाजपमध्ये कार्यरत आहेत. मात्र, लोकांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. या साऱ्या गोष्टींचा मतदारांनी बारकाईने विचार केला पाहिजे. भाजपला कोणतीही गोष्ट दडवून ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र, काही मुद्यांची सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा होणे योग्य नाही. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाCBIगुन्हा अन्वेषण विभाग