शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
3
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; तुरुंगात प्रियकरासाठी केली ही मागणी
4
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
5
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
6
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
7
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
8
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
10
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
11
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
12
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
13
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
14
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
15
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
16
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
17
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
18
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
19
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
20
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 22:10 IST

Akhilesh Yadav News: दिवाळीनिमित्त रामलल्लांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे.

दिवाळीनिमित्त रामलल्लांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सव केला जाणार आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच भाजपाने या वक्तव्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षाचा इतिहास हा राम मंदिर आंदोलनाला विरोध करण्याचा आणि हिंदूविरोधी कृत्ये करण्याचा असल्याची टीका भाजपाने केली आहे.

आज लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान, अयोध्येतील दीपोत्सवामध्ये यावेळी पणत्यांऐवजी मेणबत्त्या पेटवल्या जातील. तसेच त्यांची संख्याही कमी झाली आहे, त्यावर तुम्ही काय म्हणाल, असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारण्यात आला. त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, मी कुठलाही सल्ला देऊ इच्छित नाही. मात्र भगवान श्रीरामाच्या नावावर एक सल्ला देऊ इच्छितो. जगभरात नाताळादरम्यान, सर्व शहरं उजळून जातात. तसेच अनेक दिवस ही रोषणाई सुरू असते. आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आपण दिवे आणि  मेणबत्त्यांवर खर्च का करायचा. आपण या गोष्टी हटवल्या पाहिजेत.  आमचं सरकार आलं की, आम्ही अयोध्येत खूप चांगल्या पद्धतीने रोषणाई करू, असे अखिलेश यादव म्हणाले.

त्यावर भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राम मंदिर आंदोलनाला विरोध करणाऱ्या, अयोध्येला अनेक वर्षे अंधारात ठेवणाऱ्या आणि राम भक्तांवर गोळीबार केल्याचा अभिमान बाळगणारा पक्ष आता दीपोत्सवानिमित्त शहरात होणाऱ्या रोषणाईला विरोध करत आहे, अशी टीका पूनावाला यांनी केली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Akhilesh Yadav criticizes Ayodhya Deepotsav, suggests learning from Christmas lighting.

Web Summary : Akhilesh Yadav questioned Ayodhya's Deepotsav expenditure, suggesting emulating Christmas lighting. BJP criticized Yadav's remark, citing his party's history of opposing Ram temple. He promised better illumination if his party came to power.
टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवAyodhyaअयोध्याDiwaliदिवाळी २०२५Ram Mandirराम मंदिर