LPG सिलिंडर लाल रंगाचाच का असतो?, माहितीये यामागचं कारण…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 16:51 IST2022-09-09T16:50:03+5:302022-09-09T16:51:52+5:30
Why LPG Cylinders Are Red in Color: तुम्ही एलपीजी सिलिंडर पाहिले असतील. पण तो लाल रंगाचाच का असतो यामागचं कारण माहितीये?

LPG सिलिंडर लाल रंगाचाच का असतो?, माहितीये यामागचं कारण…
Why LPG Cylinders Are Red in Color: आजकाल जवळपास प्रत्येक घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी गॅस सिलिंडर असलेल्या शेगडीचाच वापर करण्यात येतोय. अनेक घरांमध्ये तुम्हाला सिलिंडर पाहायला मिळेल. परंतु आपल्याकडे येणारा सिलिंडर लाल रंगाचाच का असतो याचा तुम्ही विचार केलाय का? या लाल रंगामागे एक महत्त्वाचं कारण आहे. पाहूया काय आहे हे कारण.
लाल रंग हा धोक्याचा संकेत म्हणून पाहिला जातो. एलपीजी सिलिंडरमध्येही एक ज्वलनशील गॅस असतो. यामुळे तिथेही धोकायच असत. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी गॅस सिलिंडर लाल रंगानं पेंट केला जातो.
याशिवाय जर विज्ञानाबद्दल सांगायचं झालं तर विझिबल स्पेक्ट्रममध्ये लाल रंगात प्रकाशाच्या वेवलेंथ सर्वाधिक असतात. यामुळे लाल रंग लाबूनच दिसून येतो. धोक्याच्या गोष्टी लांबूनच ओळखणं शक्य होतं. म्हणूनच त्याला लाल रंगानं रंगवलं जातं. सिलिंडर तयार करताना अनेक प्रकारची काळजी घेतली जाते. एलपीजीचा कोणताही वास येत नाही. तो ज्वलनशील पदार्थ असला तरी त्याचा वास येत नाही. अशातच यामुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यात वास येण्यासाठी इथाइल मरकॅप्टन मिसळलं जातं. जेणेकरून गॅस लिक झाला तर त्याचा आपल्याला वासही येतो.