शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

का पेट घेतात इलेक्ट्रिक बाइक?; ई-बाईकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 07:53 IST

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात

गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आतापर्यंत अशा सात घटनांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत ई-बाइकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात जाणून घेऊ या.

इलेक्ट्रिक वाहनबाजाराची स्थिती

२०१२ सरकारने ‘नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन २०२०’ योजना जारी केली. २०२०-२१ या काळात विक्री झालेल्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचे १.३% प्रमाण हाेते. २०२१-२२ या कालावधीत विक्रीचे प्रमाण १.७% पोहोचले आहे. २०३० पर्यंत वाहन क्षेत्रात इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीचा हिस्सा ३०%पर्यंत पोहोचावा, अशी योजना आहे.

कोणत्या बॅटऱ्या वापरल्या जातात?ई-बाइकमध्ये लिथियम-आयन अर्थात लि-आयन या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांना कोण प्रमाणित करते?ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात. इलेक्ट्रिक गाड्यांच्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.चीनकडून आयात होणाऱ्या हलक्या दर्जाच्या सेलबाबत तज्ज्ञांनी निषेध केला असून हा प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त केले आहे.

ई-बाइकला आग लागू नये म्हणून...

ज्या कंपनीने ई-बाइक बनवली आहे त्यांच्या चार्जरनेच गाडीचे चार्जिंग करा. गाडी पाण्यात भिजली असेल तर लगेचच चार्जिंग करू नका. चीननिर्मित बॅटऱ्यांऐवजी भारतात तयार केलेल्या बॅटऱ्यांचा आग्रह धरा. गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका. ड्रायव्हिंगवेळी जळाल्याचा वास आल्यास दुर्लक्ष करू नका. लगेचच तपासणी करा.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार