"ममता बॅनर्जींसाठी चांगला पती...!" सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचं वादग्रस्त विधान, TMC भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:02 IST2025-04-10T16:02:06+5:302025-04-10T16:02:51+5:30
तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर, "बंगाली लोक ममता बॅनर्जींसाठी चांगला पती का शोधत नाही?" असे लिहिले आहे...

"ममता बॅनर्जींसाठी चांगला पती...!" सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचं वादग्रस्त विधान, TMC भडकली
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात केलेल्या एका वादग्रस्त विधानाने वाद निर्माण जाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी 'पती' शोधण्याचा सल्ला दिला होता. यावर राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने हिंसाचाराची धमकी दिली आहे. महत्वाचे म्हणजे काटजू हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर, "बंगाली लोक ममता बॅनर्जींसाठी चांगला पती का शोधत नाही?" असे लिहिले आहे. यावर घोष यांनी काटजू यांना बंगाली भाषेत धमी दिली आहे.
এটা যদি সত্যিই এই ব্যক্তির বক্তব্য হয় এবং তিনি যদি ক্ষমা চেয়ে ডিলিট না করেন, তাহলে ইনি যে পদেই থেকে থাকুন, বাংলায় পা রেখেছেন খবর পেলে সামনে গিয়ে ঠা.টিয়ে এক থাপ্পড় মারব। pic.twitter.com/5pQ1mv9DRI
— Kunal Ghosh (@KunalGhoshAgain) April 9, 2025
घोष यांनी या फोटोसोबत म्हटले आहे, "जर खरोखरच या व्यक्तीने असे म्हटले असेल आणि तिने माफी मागितली नाही, तसेच ही पोस्ट डिलिट केली नाही तर, ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे, काही फरक पडत नाही. जर ही व्यक्ती बंगालमध्ये असल्याचे आपल्याला समजले, तर आपण जाऊन तिला थापड मारणार."