शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय लीला भन्साळीच्या चित्रपटाबद्दल इतके वाद का होतात ? - नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 13:42 IST

पुण्यात एनडीएच्या दीक्षांत सोहळयात राज ठाकरेंच्या बोच-या टिकेला उत्तर देणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी पद्मावतीच्या वादाबद्दलही भाष्य केले आहे.

ठळक मुद्देचित्रपट पाहिल्यानंतर मी याबद्दल संजय लीला भन्साळींशी बोलेने असे नाना पाटेकर म्हणाले.

पुणे - पुण्यात एनडीएच्या दीक्षांत सोहळयात राज ठाकरेंच्या बोच-या टिकेला उत्तर देणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी पद्मावतीच्या वादाबद्दलही भाष्य केले आहे. दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना जीवे मारण्याची धमकी देणे पूर्णपणे चुकीचे आहे असे नाना पाटेकर म्हणाले. संजय लीला भन्साळीच्या चित्रपटांबद्दल इतके वाद का होतात ? या चित्रपटातील पात्र कशी साकारलीत त्याबद्दल मी आताच सांगू शकत नाही. 

चित्रपट पाहिल्यानंतर मी याबद्दल संजय लीला भन्साळींशी बोलेने असे नाना पाटेकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी गोव्यात 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वामध्ये पत्रकारांशी बोलतानाही नानांनी आंदोलकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यात काय आहे ते समजेल. चित्रपट पाहिल्याशिवाय विरोध करणे चुकीचे आहे असे नाना पाटेकर त्यावेळी म्हणाले होते. 

 

या संपूर्ण वादात प्रत्येकजण आपआपला दृष्टीकोन मांडत आहे. जो पर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नाही तो पर्यंत त्यात काय आहे हे आपल्याला कसं समजणार? त्यावेळी सुद्धा नानांनी दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना देण्यात येणा-या धमक्यांचा निषेध केला होता. 

मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाईंनी पद्मावतीमधील 'घुमर' गाण्यावर केला डान्ससध्या पद्मावती चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु आहे. मुलायम सिंह यादव यांच्या छोटया सूनबाई अपर्णा यादवही आता अडचणीत आल्या आहेत.अपर्णा यादव यांनी पद्मावती चित्रपटातील 'घुमर' गाण्यावर नृत्य सादर केले. लखनऊ येथील एका कार्यक्रमात अपर्णा यादव यांनी घुमर गाण्यावर डान्स केला. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी अपर्णा यादव यांना धमकी दिली आहे. 

भाजपा नेते सूरज पाल अमूनी दिली दीपिका पादुकोणला धमकी हरियाणामधील भाजपाचे मीडिया प्रमुख संयोजक सूरज पाल अमू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लीला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याचवेळी त्यांनी सिनेमात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंहचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे. 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कुणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार', असं सूरजपाल अम्मू म्हणाले होते.  

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरRaj Thackerayराज ठाकरे