शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना रोजगार का मिळत नाही? उत्तर द्या, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 20:15 IST

सध्या देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ द्वेशाचे राजकारण करू शकतात

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाट येथे आंदोलन केले. या आंदोलनावेळी उपस्थितांना संबोधित करतान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सध्या देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ द्वेशाचे राजकारण करू शकतात, असे विद्यार्थ्यांना वाटू लागले आहे. आर्थिक मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भावनिक मुद्दे पुढे केले जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची सातत्याने का घसरण होत आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार का मिळत नाही आहे, असा सवाल करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला.

देशाच्या शत्रूंनी या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाहीत. देशातील शत्रूंना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे अशक्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते काम करून दाखवले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

  केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हिंसक आंदोलनेही होत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाट येथे आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केली जाणार नसल्याची घोषणा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला. हा कायदा लोकशाहीसाठी धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्यावरून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. केंद्राचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. अशी टीका गहलोत यांनी केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा