Why do some people get angry after mentioning the name of Shri Ram, Mamata Banerjee was targeted by arun govil | श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो? ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो? ममता बॅनर्जींवर साधला निशाणा

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसेच, त्यांनी ही गर्दी एका खास पार्टीची असल्याचा आरोप भाजपावर केला आहे. ममता दिदींच्या या कृतीनंतर रामायण मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या धरतीवर असा कोण आहे, ज्याने प्रभू श्रीरामाचे नाव ऐकलं नसेल, असेही गोविल यांनी म्हटलंय. 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला. 'मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असले पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही,' असे म्हणत ममताबॅनर्जींनी आपलं भाषण संपवलं होतं. सोशल मीडियावर ममता यांचं हे छोटेखानी भाषण व्हायरल झालं. तसेच, वाद-विवादही सुरु झाले आहेत. यावरुन, अभिनेता अरुण गोविल यांनी नाव न घेता कार्यक्रमातील कृतीवरुन ममता बॅनर्जींसह, भाजपा समर्थकांनाही लक्ष्य केलंय.  

गोविल यांनी ट्विट करुन म्हटले, काही लोकांना श्री राम नाव घेतल्यानंतर राग का येतो?. श्री राम प्रत्येक मानवासाठी आदर्श आहेत. राम यांचे संपूर्ण जीनव मानव जातीसाठी प्रेरणा आहे. श्रीराम नावाने चिडवणे किंवा विरोध करणे संपर्ण मानव जातीच्या विरोध आहे, असा कोण आहे या देशाच्या धरतीवर ज्याने प्रभू श्रीराम यांचे नाव ऐकलं नसेल, असे म्हणत कोलकाता येथील कार्यक्रमातील प्रसंगावर गोविल यांनी नाराजी व्यक्त केलीय. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why do some people get angry after mentioning the name of Shri Ram, Mamata Banerjee was targeted by arun govil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.