शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात सरकारला का कळालं नाही?; मोरबी दुर्घटनेवरून राष्ट्रवादीनं विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:52 IST

अनेकांनी या दुर्घटनेत जीव गमावला आणि अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुजरातचे अधिकारी यातून स्वत:ची सुटका करू शकत नाहीत असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

मोरबी - गुजरात येथील मोरबी पूल कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात ज्यांनी स्वत:ची माणसं गमावली त्यांच्या कुटुंबाविषयी आम्हाला संवेदना आहेत. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत. नुकत्याच नूतनीकरण केलेल्या या पूलाचं काम सरकारी निविदा देऊन करण्यात आले होते. मग या घटनेसाठी गुजरात सरकारला जबबादार धरले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

या दुर्घटनेबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, नूतनीकरणानंतर आवश्यक फिटनेस सर्टिफिकेट आणि गरजेच्या परवानग्या न घेता हा पूल पुन्हा खुला केल्याचं गुजरात सरकारला का कळले नाही? अनेकांनी या दुर्घटनेत जीव गमावला आणि अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुजरातचे अधिकारी यातून स्वत:ची सुटका करू शकत नाहीत आणि पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या खासगी कंपनीसह तेही या घटनेस तितकेच जबाबदार आहेत असं सांगत केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा आणि याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 

काय आहे प्रकरण?गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुलावर असलेले काही जण पुलाच्या तारा हलवत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही टवाळखोरांच्या उपद्रवामुळे ही घटना घडली तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. 

नुकतीच झाली होती दुरूस्तीमोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे. 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलNCPराष्ट्रवादी काँग्रेस