शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'नंतर ५ मिनिटांनी भारताने का लावला पाकिस्तानला फोन?; CDS चौहान यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:48 IST

हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरबाबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला माहिती देण्यात आली. हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानला फोन करून जर तुम्ही प्रतिहल्ला केला तर पुढच्या वेळी याहून ताकदीने उत्तर देऊ असं बजावले. भारताचे टार्गेट केवळ दहशतवाद्यांना संपवण्याचं होते असं त्यांनी खुलासा केला.

अलीकडेच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या फ्यूचर वॉर्स अँन्ड वारफेयर कार्यक्रमात सीडीएस अनिल चौहान यांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, डिजीएमओने दहशतवादी तळांना टार्गेट केल्यानंतर ५ मिनिटांनी पाकिस्तानला फोन करून त्याची माहिती दिली होती. आम्ही पाकिस्तानी जनरलला जर तुम्ही पुन्हा हल्ला केला तर यापेक्षाही ताकदीने कठोर उत्तर देऊ असं बजावले. आमच्याकडे पाकिस्तानपेक्षा कित्येक पट जास्त खतरनाक शस्त्रे आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच पहलगाममध्ये जे घडले ते क्रूर होते. हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर धर्माच्या नावाने गोळ्या घातल्या गेल्या. हे सहन केले जाऊ शकत नाही. त्यातून समाजात द्वेष निर्माण होतो. हा भारतात घडलेला पहिला दहशतवादी हल्ला नाही. देशात याआधीही अनेक दहशतवादी हल्ले झालेत. भारत दहशतवादाचा सर्वात जास्त बळी पडलेला आहे. त्यामुळे २० हजाराहून अधिक भारतीय मारले गेलेत असं सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलं.

 

पाकच्या ड्रोन हल्ल्यावर काय बोलले?

दरम्यान, भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हल्ले अयशस्वी केले. आम्हाला ठाऊक होते, आमच्याकडे उत्तम काऊन्टर ड्रोन सिस्टम आहे. दोन्ही देशांनी वेगवेगळ्या प्रकारे सक्षम बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निश्चित ऑपरेशन सिंदूर जोखमीचे होते हे माहिती होते. परंतु आपली जेवढी क्षमता आहे, तेवढी युद्धाच्या मैदानात वापरण्यात आलीच नाही असंही सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी