शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? समोर आलेलं कारण ऐकून हैराण व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:05 IST

नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली.

एकीकडे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, आता भारतातून काही हेर पकडले जात आहे. भारतात राहून देशाची गुप्त माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाकिस्तानचे हेर देशभरातून पकडले जात असतानाच, नागपूरमधील एक महिला सीमा पार करून पाकिस्तानात पोहोचल्याचे समोर आले होते. भारतीय सैन्याकडून या महिलेचा शोध घेतला जात होता. अखेर आता ही महिला सापडली असून, ती पाकिस्तानात का गेली होती याचे करण देखील समोर आले आहे.     

नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली. यानंतर सैन्याने आणि पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, गावात तिने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. तिचे फोन कॉल डिटेल तपासताच त्यात काही पाकिस्तानी क्रमांक आढळून आले होते. यावरून सुनीता पाकिस्तानात गेली, यावर शिक्कामोर्तब झाला होता. ज्योतीप्रमाणे सुनीता देखील या हेरगिरी प्रकरणात सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता खरे कारण समोर आले आहे. सुनीता पाकिस्तानात राहणाऱ्या एका पाद्रीच्या प्रेमात पडली होती,आणि त्याच्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचे समोर आले आहे. 

या आधीही केलेला प्रयत्न!पाकिस्तानी रेंजर्सनी सोमवारी अटारी सीमेवर या महिलेला भारतीय सुरक्षा दलाच्या हवाली केले. यावेळी चौकशी दरम्यान, सुनीताने सत्य सांगत आपण प्रेमासाठी पाकिस्तानात गेल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता एक पाकिस्तानी पाद्रीच्या प्रेमात पडली होती. त्याला भेटण्यासाठी सुनीताने हे पाऊल उचलल्याची कबुली दिली. या आधीही तिने सीमा ओलंडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तिला सैनिकांनी अडवले होते. यावेळेस मात्र तिचा प्रयत्न सफल झाला होता. 

अधिक तपास सुरू 

सुनीताने भारताची सीमा पार केली होती. मात्र,पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच रेंजर्सनी तिला ताब्यात घेतले. यानंतर पाकिस्तानने तिला भारताकडे सुपूर्द केले. सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा तिची चौकशी करत आहेत. सुनीताचे फोन, मेसेज तपासले जात आहेत.   

टॅग्स :nagpurनागपूरPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJyoti Malhotraज्योती मल्होत्रा