Hathras Gangrape : ऊसाच्या शेतातच का सापडतात मुली?, हाथरस प्रकरणावरुन भाजपा नेता बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 09:06 AM2020-10-07T09:06:59+5:302020-10-07T09:14:28+5:30

Hathras Gangrape : बाराबंकी नगरपालिका, नबावगंजचे चेअरमन आणि भाजपा नेते रंजीत श्रीवास्तव यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया देताना, पीडित मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे.

Why can girls be found in a sugarcane field? bjp leader controversial statement on hasrath gangrape | Hathras Gangrape : ऊसाच्या शेतातच का सापडतात मुली?, हाथरस प्रकरणावरुन भाजपा नेता बरळला

Hathras Gangrape : ऊसाच्या शेतातच का सापडतात मुली?, हाथरस प्रकरणावरुन भाजपा नेता बरळला

Next
ठळक मुद्देबाराबंकी नगरपालिका, नबावगंजचे चेअरमन आणि भाजपा नेते रंजीत श्रीवास्तव यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया देताना, पीडित मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे.

लखनौ - हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर तिच्या झालेल्या मृत्यूमुळे सध्या संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आलेली आहे. याप्रकरणातील आरोपींचा भाजपा नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, भाजपा नेतेही याप्रकरणी स्पष्टपणे भूमिका मांडताना दिसत नाहीत. आता, एका भाजपा नेत्याने हाथरस प्रकरणावरुन मुक्ताफळे उधळली आहेत. बलात्कार पीडित मुलींच्या चारित्र्यावरच या नेत्याने प्रश्न उपस्थित केला आहे. 

बाराबंकी नगरपालिका, नबावगंजचे चेअरमन आणि भाजपा नेते रंजीत श्रीवास्तव यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया देताना, पीडित मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला आहे. या भाजपा नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पत्रकाराने रंजीत यांचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करत, त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. या व्हिडिओत रंजी श्रीवास्तव यांनी मुक्ताफळे उधळल्याचं दिसून येतंय. बलात्कार प्रकरणातील मृत मुली गव्हाच्या शेतात का भेटत नाहीत, धान्याच्या शेतात का भेटत नाहीत? असा सवाल श्रीवास्तव यांनी उपस्थित केला. हद्द म्हणजे मृत मुली ह्या ऊसाचा, मक्याच्या शेतातच का सापडतात? असेही ते म्हणाले. 

या मुलीने प्रेमसंबंधांतूनच मुलाला शेतात बोलावले असेल, त्यावेळी काही जवळ्याच व्यक्तींना त्यांना रंगेहात पकडले असेल. तुम्ही पहा, अशा प्रकरणात सापडणाऱ्या मुली, ऊसाच्या किंवा मक्याच्या शेतातच आढळतात. जंगलात किंवा गटारातच पडलेल्या असतात. अखेर अशाच ठिकाणी या मुली का सापडतात? असे वादग्रस्त वक्तव्य रंजीत श्रीवास्तव यांनी केलंय. वास्तव यांच्या या व्हिडिओवरुन नेटीझन्समध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.   

काय आहे नेमकं प्रकरण

हाथरसमधील एका तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच पीडित युवतीची आरोपींनी जीभही कापल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पीडितेच्या मणक्याचे हाडही मोडले होते. क्रूरपणे बलात्कार झालेल्या तरुणीला उपचारांसाठी प्रथम अलीगडमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला अधिक उपचारांसाठी दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र तिथे उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडितेवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उत्तर प्रदेशचे सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. पीडित तरुणीवर पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आऱोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

आरोपीचे पीडित कुटुबांशी संभाषण

हाथसर प्रकरणात आता नवे गौप्यस्फोट होत आहेत. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल १०४ वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी १३ ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. तसेच यापैकी बहुतांश कॉल हे चंदपा येथून करण्यात आले असे दिसून आले. या परिसर पीडितेच्या गावापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे.
 

Web Title: Why can girls be found in a sugarcane field? bjp leader controversial statement on hasrath gangrape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.