कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 04:27 AM2020-12-02T04:27:01+5:302020-12-02T07:25:48+5:30

कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे?

Why is Baliraja angry? Know, what is the background behind the agitation in Delhi? | कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी

कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी

googlenewsNext

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा सातत्याने पुनरुच्चार करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे तीन विधेयके मंजूर करत त्यांचे कायद्यात रुपांतर केले. मात्र, हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, असे बळीराजाचे म्हणणे आहे. म्हणूनच या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे, ही चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. काय आहेत हे कायदे? बळीराजा का रागावला आहे? पाहू या...

कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सरळीकरण) कायदा  
या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वा धान्याची खुली विक्री करण्याचे स्वातंत्र्य
म्हणजे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी नेण्याची गरज नाही
विपणन आणि वाहतूक खर्चात बचत होणार
राज्यांतर्गत तसेच दोन राज्यांत शेतीविषयक व्यापार वाढीस लागणार

शेतकऱ्यांचा आक्षेप
१. पिकांची आधारभूत किंमत पद्धत लयाला जाईल.
२. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल.
३. ‘ई-नाम’सारख्या सरकारी पोर्टल्सचे काय होईल?
सरकारचा दावा 
१. आधारभूत किंमत पद्धत पूर्वीसारखीच चालू राहणार.
२. बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही.
३. शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल ४. ई-नाम सुरूच राहणार

जीवनावश्यक वस्तू कायदा 
धान्य, डाळी, तेलबिया, खाद्य तेल, कांदा-बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटविणार
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळेल आणि बाजारात स्पर्धा वाढेल

शेतकऱ्यांचा आक्षेप
१. मोठ्या कंपन्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करतील
२. त्यामुळे काळाबाजार वाढेल

सरकारचा दावा 
१. पिकांच्या नासाडीची चिंता मिटेल
२. कांदा-बटाट्याचे उत्पादन शेतकरी बिनधास्त करू शकतील
३. कांदा-बटाट्याच्या किमतींबाबत शेतकरी निश्चिंत राहतील

पिकांच्या किमतींबाबत आश्वासन आणि कृषिसेवा करार कायदा  
शेतीविषयक कंत्राट-करारांसंदर्भातील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद
शेतमालाची विक्री, शेतीविषयक अन्य सेवा, कृषीउद्योगातील संस्था, घाऊक व किरकोळ विक्रेते आणि निर्यातदार शेतकऱ्यांशी संलग्न होणार
शेतकऱ्यांना सर्वोत्तम बियाण्याचा पुरवठा, पिकांच्या आरोग्याची सातत्याने पाहणी
कर्जाची सुविधा आणि पीक विमा योजना

शेतकऱ्यांचा आक्षेप
१. कंत्राटीपद्धतीमुळे शेतकऱ्यांची बाजू लंगडी होईल.
२. पिकांच्या किमती शेतकरी ठरवू शकणार नाहीत
३. लहान शेतकरी कंत्राटी शेती करू शकणार नाहीत
४. मोठ्या कंपन्यांनाच फायदा जास्त होईल

सरकारचा दावा 
१. कंत्राटी शेती करावी की नाही, हे ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना
२. पिकांची किंमत ठरविण्याचे अधिकारही शेतकऱ्यांकडेच राहणार
३. देशात १० हजार फार्म प्रोड्युसर ग्रुप्स तयार केले जाणार
४. या ग्रुप्सच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांचे संघटन होणार
५. त्यातून पिकांच्या किंमत निश्चितीबाबतचे धोरण ठरणार

Web Title: Why is Baliraja angry? Know, what is the background behind the agitation in Delhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.