शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 07:04 IST

फुटपाथवरील अतिक्रमण, बेकायदा बांधकामे किंवा प्रदूषण... सामान्य नागरिकांनी हे का सहन करावे?  पालिकेच्या अराजकतेला सामान्यांनी मुकाटपणे सहन करायचे का? असे प्रश्न न्यायालयाने केले.

मुंबई : पालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता, आळशीपणा, बेफिकिरी या वृत्तीमुळे पालिकेविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात येतात. अशा अधिकाऱ्यांच्या कृत्यांचा बचाव करण्यासाठी पालिका सामान्यांचा पैसा खर्च करते. सामान्य नागरिकांनी हे मुकाटपणे का सहन करावे? असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवरील सुनावणीत केला.महापालिका अनावश्यक खटल्यांचा बचाव करण्यासाठी किंवा टाळता येणाऱ्या खटल्यांवर किती संसाधने आणि सार्वजनिक पैसा खर्च करते, याची माहिती आपल्याला नाही. या खटल्यांवर खर्च होणारा पैसा जनहितासाठी उपयुक्त  असलेल्या कामांसाठी वापरता येऊ शकतो, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने म्हटले.पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेता आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे निर्माण होणाऱ्या खटल्यांवर मुंबईकरांचा पैसा खर्च केला जातो. याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे. न्यायमूर्ती म्हणून नाही तर नागरिक म्हणूनही आम्हाला ही बाब खटकते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. दादरच्या १२ मजली इमारतीचे बांधकाम गेली १५ वर्षे अपूर्ण आहे. ११० भाडेकरू विस्थापित आहेत. या इमारतीचा केवळ सांगाडा उभा केला. असतानाही दोन मजल्यांवर दुकाने थाटली. त्यासाठी पालिकेकडून ओसी, फायर एनओसी काहीही घेतले नाही. 

हे मुकाटपणे सहन करायचे का?पालिका अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. व्यक्तिगत किंवा विभागनिहाय पातळीवर किती खटले दाखल करण्यात आले आहेत, किती लढण्यात आले आहेत आणि त्यासाठी किती पैसे खर्च करण्यात आले आहेत, याची नोंद करणे आवश्यक आहे. जोपर्यंत कठोर, शिस्तबद्ध उपाययोजना आखल्या जात नाहीत, तोपर्यंत ‘आम्ही मुंबईकर’ शहरी गोंधळ, नागरी अराजकता आणि अव्यवस्थेचे बळी पडत राहू. मग  सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण, पादचाऱ्यांचे मार्ग किंवा फुटपाथवरील अतिक्रमण, बेकायदा बांधकामे किंवा प्रदूषण... सामान्य नागरिकांनी हे का सहन करावे?  पालिकेच्या अराजकतेला सामान्यांनी मुकाटपणे सहन करायचे का? असे प्रश्न न्यायालयाने केले.दोन सदस्यांची समितीपालिकेविरोधातील खटल्यांचा आढावा घेऊन त्यावर प्रतिबंध कसा घालता येईल, याच अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने दोनसदस्यीय समितीची नियुक्ती केली. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. गौतम पटेल आणि वरिष्ठ वकील नौशाद इंजिनिअर यांचा यात समावेश आहे. तसेच पालिका आयुक्तांना या समितीमध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. ही समिती आयुक्तांकडे शिफारशी सादर करील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र