शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:42 IST

महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही?

हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही? कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी तर अमित शहा यांनी जागा वाटपाबाबत बंद दरवाजाआड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती आणि हा मुद्दा सोडविला होता. त्यावेळी जागा वाटपावरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली होती. मग आता नेमके काय झाले? अमित शहा शिवसेनेवर का रागावलेले आहेत?यावेळी मात्र अमित शहा ना मुंबईला आले ना उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. विधानसभा निवडणुकांनंतर त्यांनी गप्प राहणेच पसंत केले. निवडणुकीपूर्वी, ‘लोकमत’शी अनौपचारिकपणे बोलताना अमित शहा यांनी सत्तेचा ५० : ५० टक्के फॉर्म्युला असल्याचे नाकारले होते. हा राजकीय पेच सोडविण्यासाठी त्यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही आणि शिवसेनेला अन्य पर्याय खुले असल्याचे सांगितले. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने आपला सूर बदलला आणि आक्रमक भूमिकेत मर्यादा ओलांडल्या. भाजप सूत्रांचे असे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांनी विधाने करण्याऐवजी अमित शहा यांच्यासोबत बैठकीसाठी आग्रह धरायला हवा होता; पण शिवसेनेच्या या भूमिकेनंतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा निर्णय केला की, शिवसेनेला काय करायचे ते करू द्या. आता २४ नोव्हेंबर रोजी आशेचा किरण आहे. त्यादिवशी उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात.>बंद दाराआडील चर्चा सार्वजनिक का?सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने ‘लाईन क्रॉस’ करून मीडियात वक्तव्ये केली त्यावरून अमित शहा हे अतिशय नाराज होते. त्यांच्या ६, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी अमित शहा हे अतिशय रागावलेले होते. बंद दाराआड झालेली चर्चा उद्धव ठाकरे हे मीडियासमोर का सांगत आहेत? यावरून ते नाराज होते. या बैठकीच्या गोपनीयतेबाबत त्यांनी एवढी काळजी घेतली होती की, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबईतील या चर्चेत सहभागी करून घेतले नव्हते. या घडामोडींनंतर अमित शहा यांनी गप्प राहणेच पसंत केले. शिवसेना जेव्हा कमी जागा लढण्यासाठी तयार झाली, तर मग मुख्यमंत्रीपदावर ते दावा कसा काय करू शकतात? याचेही अमित शहा यांना आश्चर्य वाटले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे