शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

विना मुद्यांच्या काट्याच्या लढतीत कौल कुणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:23 IST

राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. 

रवी टाले - डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसदरम्यान काट्याची टक्कर दिसत असली, तरी निवडणुकीत मुद्यांचा मात्र सर्वथा अभाव जाणवतो. राज्यात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील प्रत्येक दहावा मतदार बेरोजगार आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्यांच्याशी बोलताना सतत जाणवते. आरोग्य सुविधांचा अभाव हादेखील एक मोठा मुद्दा आहे. विशेषतः पर्वतीय क्षेत्रात हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. पर्वतीय भागातून राज्याच्या मैदानी भागात अथवा इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेले स्थलांतर हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. पर्वतीय भागातील मानव-वन्य पशू संघर्ष हा पण गंभीर मुद्दा आहे. या प्रदेशाने १९७० च्या दशकात प्रसिद्ध गांधीवादी व पर्यावरणवादी चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली जंगलांच्या रक्षणासाठी ‘चिपको आंदोलन’ छेडले होते. त्यानंतर १९८० च्या दशकात सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण रक्षणासाठी टेहरी धरणाच्या निर्मितीला प्राणांतिक विरोध केला होता. मात्र, त्याच प्रदेशात आज पर्यावरणाची अपरिमित हानी होताना दिसत असूनही, कुणीही आवाज उठवायला तयार नाही. सर्वसामान्य मतदारांना निवडणुकीच्या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न केला की, ते एक तर नरेंद्र मोदींची तोंड फाटेस्तोवर प्रशंसा करतात किंवा त्यांनी कसे देशाचे वाटोळे केले, हे समजावून सांगायला लागतात अथवा तोंडात मिठाची गुळणी धरतात. राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. 

ज्वलंत मुद्दे इथे नाहीत-    उत्तराखंड दोन दशकांपूर्वी उत्तर प्रदेशचा भाग होता खरा; पण त्या राज्यातील मुद्दे उत्तराखंडमध्ये गैरलागू आहेत.-    उत्तर प्रदेश निवडणुकीतील कायदा व सुव्यवस्था, वीज पुरवठा हे ज्वलंत मुद्दे इथे नाहीत. -    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालावर शेतकरी आंदोलनाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र,उत्तराखंडमध्ये उधमसिंग नगर जिल्हा वगळता इतरत्र कुठेही तो मुद्दाच नाही. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेस