भविष्य निर्वाह निधी कोणाच्या कुंडलीत? स्वच्छतेचा ठेका : कामगारांना रक्कम मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:21+5:302015-09-01T21:38:21+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम, गोदाघाट परिसर आणि भाविक मार्गासाठी स्वच्छतेचा ठेका देत महापालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांचे वेतन अदा केले जात असतानाच त्यांच्या निश्चित केलेल्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा निधीची प्रतिदिन प्रतिकामगार सुमारे ९३ रुपयांची रक्कमही दैनंदिन कपात केली जात आहे. मात्र, ठेक्याची मुदत संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची एकत्रित रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित कामगारांना महापालिकेचे उंबरे झिजवावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनेकांना रक्कम प्रत्यक्ष हातात पडेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. ठेका संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम कोणाच्या कुंडलीत आहे, असा गमतीशीर सवालही उपस्थित होत आहे.

भविष्य निर्वाह निधी कोणाच्या कुंडलीत? स्वच्छतेचा ठेका : कामगारांना रक्कम मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम, गोदाघाट परिसर आणि भाविक मार्गासाठी स्वच्छतेचा ठेका देत महापालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कामगारांचे वेतन अदा केले जात असतानाच त्यांच्या निश्चित केलेल्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा निधीची प्रतिदिन प्रतिकामगार सुमारे ९३ रुपयांची रक्कमही दैनंदिन कपात केली जात आहे. मात्र, ठेक्याची मुदत संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची एकत्रित रक्कम प्राप्त करण्यासाठी संबंधित कामगारांना महापालिकेचे उंबरे झिजवावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनेकांना रक्कम प्रत्यक्ष हातात पडेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. ठेका संपल्यानंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम कोणाच्या कुंडलीत आहे, असा गमतीशीर सवालही उपस्थित होत आहे. महापालिकेने गोदाघाट, भाविक मार्ग याठिकाणी पाच ठेकेदारांना स्वच्छतेचा ठेका दिला आहे, तर साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद न्यायप्रवीष्ट असल्याने गोदाघाट व भाविकमार्गासाठी असलेल्या ठेकेदारांकडूनच अतिरिक्त मनुष्यबळ घेत स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. महापालिकेने सुमारे ३३०० सफाई कामगार नेमले असल्याचे सांगितले जाते. या कामगारांना किमान वेतन २९३.८४ रुपये असून त्यात एचआरए समाविष्ट केल्यास ३०८.५३ रुपये जमा होणे अपेक्षित आहेत. त्याचबरोबर ठेकेदाराकडून भविष्य निर्वाह निधी ३५.२६ रुपये, ईएसआय ५.३८ रुपये जमा होणे गरजेचे आहे, तर महापालिका दोन्ही मिळून आपला हिस्सा कामगाराच्या खात्यात ५३ रुपये जमा करत असते. भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआयची रक्कम कपात होऊन कामगाराच्या हातात प्रत्येकी २६७.८८ रुपये पडणे आवश्यकच आहे. मात्र, कामगारांना प्रत्यक्षात हाती पडणार्या रकमेत तफावत असून, अनेक कामगारांकडून वेगवेगळ्या रकमेचे आकडे सांगितले जात आहेत. वेतनाच्या या गफलतीबद्दल स्थायी समितीनेही प्रत्यक्ष कामगारांच्या भेटी घेऊन पोलखोल केली होती. आता कामगारांच्या खात्यात जमा होणार्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. सदर रक्कम जमा होत असेलही; परंतु प्रत्यक्षात कामाची मुदत संपल्यानंतर कामगारांच्या हातात ती पडेल की नाही, याबाबत शंका उत्पन्न झाल्या आहेत. अनेक कामगार हे परप्रांतीय असून बव्हंशी कामगारांना तर बॅँक खात्याचे पुरेसे ज्ञानही नाही. त्यामुळे एटीएमचा वापर करणे तर दूरच कामाची मुदत संपून गेल्यानंतर संबंधित कामगार हे आपल्या गावी निघून जातील. त्यामुळे संबंधित कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कशी अदा केली जाणार, त्याबाबत कामगारांनाही काहीही माहिती देण्यात आलेली नाही. असंख्य कामगारांना तर असा काही निधी आपल्या भविष्यात लिहून ठेवला आहे, याची सुतराम कल्पनाही नाही. त्यामुळे हा निधी नेमका कुणाच्या कुंडलीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.इन्फोकसा मिळणार निधी?सदर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कशी अदा केली जाणार, याविषयी एका वरिष्ठ अधिकार्याकडून माहिती जाणून घेतली असता त्यांनी धक्काच दिला. कामाची मुदत संपल्यानंतर संबंधित कामगाराला व्यक्तिगतरीत्या महापालिकेकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्याची फाईल प्रशासकीय पातळीवर फिरेल. नंतर ती मान्यतेनंतर भविष्य निर्वाह निधीकडे जाईल. त्यानंतरच निधी कामगाराच्या हाती पडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. बव्हंशी कामगार हे अशिक्षित आणि परप्रांतीय असल्याने त्यांना या प्रक्रियेतून जाण्यासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे. हातावर पोट भरणार्या या कामगारांकडून त्यामुळे सदर पैशांवर पाणी सोडण्याचीच शक्यता बोलून दाखविली जात आहे. परिणामी, सदर निधी नेमका कोणाच्या घशात जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.