शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

संपूर्ण देश आज काश्मीर बनलाय; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 14:56 IST

पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. 

ठळक मुद्देतुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहेपोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतातपोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा झाला

नवी दिल्ली - भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाती कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकास करु असा दावा सरकारने केला मात्र प्रत्यक्षात आता संपूर्ण देशात काश्मीरसारखी परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका सिन्हा यांनी केली. 

यशवंत सिन्हा यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ते संबोधित करत होते. सरकारने कलम ३७० आणि ३५ अ हटवला कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढला जाईल. हे मतभेद दडपण्याचे तत्व आहे असा आरोप त्यांनी केला. 

संपूर्ण देश काश्मीर बनलायशवंत सिन्हा म्हणाले की, सरकारमधील लोकांनी दावा केला होता की ते काश्मीरला भारताच्या इतर राज्याप्रमाणे बनवतील, पण आज पाच महिन्यांनंतर काश्मीर भारताच्या इतर राज्यांप्रमाणे झाला नाही तर उर्वरित भारत काश्मीरसारखा नक्कीच बनला आहे. जर कोणी काश्मीरमधील शोपियान, बारामुल्ला किंवा पुलवामा येथे गेले तर त्यांना सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त दिसेल. आणि आता अशीच परिस्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे जिथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात असल्याचं दिसून येत असं माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी सांगितले. 

पोलिस आणि गुंडांमध्ये फरक नाहीसा. जेएनयू हिंसाचाराबद्दल यशवंत सिन्हा म्हणाले की तुम्ही जिथे जिथे पहाल तिथे सर्वत्र दडपशाहीचं वातावरण आहे. यापूर्वी ते दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करत असत पण आता ते गुंडांचा वापर करत आहेत. ते म्हणाले की जेएनयूमध्ये जे काही झाले ते सरकारी पोलिस आणि सरकारी गुंडांमधील जो फरक होता तो संपला. पोलिस इथल्या निरपराध लोकांना मदत करत नाहीत तर गुंडांना मदत करतात, ही संपूर्ण देशातील एक विचित्र परिस्थिती आहे अशी परखड टीकाही यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर केली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरjnu attackजेएनयूjamia protestजामियाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार