शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत कोण मारणार बाजी? ७ राज्यांतील ५८ जागांकरिता आज मतदान; ओडिशातील विधानसभा निवडणुकांचाही तिसरा टप्पा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:07 IST

दिल्ली, हरयाणातील लढतींकडे सर्वांचे अधिक लक्ष लागून राहाणार आहे. त्याच दिवशी ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात ४२ जागांसाठी जनता कौल देणार आहे.  जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील मतदान उद्या, शनिवारी होणार आहे. खराब हवामान व रसदविष

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणूक उत्सवाचा सहावा टप्पा आज, ;शनिवारी (दि.२५ मे) पार पडणार आहे. या टप्प्यात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील लोकसभेच्या ५८ जागांकरिता मतदान होईल. या निवडणुकांचे आतापर्यंतचे पाच टप्पे काही तुरळक प्रकार वगळता शांततेत पार पडले. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात लोकसभेच्या १४, हरयाणा, दिल्लीतील सर्व जागा अनुक्रमे १० व ७ यांच्यासाठी मतदान होईल. दिल्ली, हरयाणातील लढतींकडे सर्वांचे अधिक लक्ष लागून राहाणार आहे. त्याच दिवशी ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात ४२ जागांसाठी जनता कौल देणार आहे. 

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील मतदान उद्या, शनिवारी होणार आहे. खराब हवामान व रसदविषयक काही बाबींमुळे या मतदारसंघातील निवडणूक तिसऱ्या टप्प्याऐवजी सहाव्या टप्प्यात घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. ओदिशा, पश्चिम बंगालमधील काही लोकसभा जागांवरही उद्याष शनिवारी मतदान होणार आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, पश्चिम बंगालमधील काही जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही राज्ये भाजप व काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. 

दिल्लीत प्रतिष्ठा पणाला?आप आणि काँग्रेसने हातमिळवणी केल्यामुळे केंद्रातील भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सात जागांवर मतदानासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. उद्या रणरणत्या उन्हात दिल्लीतील १ कोटी ५२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक बडी नावे उद्या मतदान करतील. 

ओदिशामध्ये बिजद, भाजप, काँग्रेस आक्रमकओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या,  ४२ जागांसाठी होणाऱ्या लढतीत बिजद, भाजप, काँग्रेस व अन्य पक्ष मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आक्रमक प्रचार करीत आहेत. या राज्यातील निवडणुकांचा चौथा टप्पा १ जूनला पार पडेल.त्याच दिवशी लोकसभा निवडणुकांचा अखेरचा व सातवा टप्पा होणार आहे. बिजदवर भाजपने कडक टीका सुरू ठेवली आहे. हे ओडिशातील यावेळच्या विधानसभा निवडणुकांचे मोठे वैशिष्ट्य आहे.

सहाव्या टप्प्यात ११.१३ कोटी मतदार- लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात ११.१३ कोटी मतदार असून त्यामध्ये ५.८४ कोटी पुरूष, ५.२९ कोटी महिला, ५१२० तृतयीपंथीय मतदार आहेत.- शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी मतदान होतो हा समज यावेळी खोटा ठरवावा असे आवाहन निवडणूक आयोगाने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबादसहित अन्य शहरी मतदारांना केले आहे.- लोकसभा निवडणुकांचा सर्वात शेवटचा, सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार असून लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. २५ राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील तसेच ४२८ लोकसभा मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया या निवडणुकांच्या पहिल्या पाच टप्प्यांतच पूर्ण झाली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Odishaओदिशा