2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 09:46 IST2023-08-23T09:46:00+5:302023-08-23T09:46:32+5:30
Lok Sabha Election: 'आतापर्यंत राजकीय पक्षांना सीबीआयची भीती दाखवली जात होती. मात्र आता या आघाडीवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे.'

2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं
विरोधकांच्या आघाडीत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी दावेदारांची यादी वाढतानाच दिसत आहे. आता, ज्या पक्षाकडे सर्वाधिक जाका त्यांचा पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असे काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटले आहे. यामुळे, विरोधी आघाडीसमोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींसमोर पर्यायी उमेदवार म्हणून कुणाला मैदानात उतरवावे? हा मोठा प्रश्न आहे. यासाठी विरोधाकांकडून अद्याप कुठलेही नाव समोर आलेले नाही. मात्र या संदर्भात आता काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांचे वक्तव्य समोर आले आहे.
कोन असेल पंतप्रधान पदाचा उमेदवार?-
यासंदर्भात बोलताना प्रमोद तिवारी म्हणाले, '2024 मध्ये देशभरातील अनेक छोटे मोठे पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढतील आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील त्या पक्षाच्या नेत्याला I.N.D.I.A खडून पंतप्रधान पदाचा नेता म्हणून निवडले जाईल. येणाऱ्या काही दिवसांत आणखी काही पक्ष इंडियामध्ये सामील होतील. आतापर्यंत राजकीय पक्षांना सीबीआयची भीती दाखवली जात होती. मात्र आता या आघाडीवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे.'
टीम I.N.D.I.A मध्ये नवा संग्राम? -
काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी मंगळवारी सयंकाळी धर्म नगरी म्हटल्या जाणाऱ्या अयोध्येत पोहोचले होते. त्यांनी येथे हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी अयोध्येतील संतांचीही भेट घेतली. तिवारी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खोटार्डेपणाचा पर्दाफाश होईल. आगामी सरकार हे इंडिया आघाडीचे असेल. याच बरोबर 2024 च्या निवडणुकीत ज्या पक्षाकडे सर्वाधिक जागा असतील त्याच पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असेही प्रमोद तिवारी यावेळी म्हणाले.