शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनं राजस्थानात कुणाच्या चेहऱ्यावर लढवायला हवी निवडणूक? सर्व्हेतून पायलट यांना मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:08 IST

खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे.

राजस्थानात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. येथे या दोन्ही पक्षांत काट्याची टक्कर बघायला मिळेल असे बोलले जात आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र यातच, एबीपी न्यूजने सी-व्होटरच्या साधीने एक सर्व्हे केला आहे. यात, काँग्रेसने सीएम पदासाठी कुणाचा चेहरा प्रोजेक्ट करायला हवा? असा प्रश्न विचारला. तर जाणून घेऊयात लोकांनी काय दिलं उत्तर?

या सर्व्हेने सर्वांनाच चकित केले आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतील 41 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, अशोग गेहलोत हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला हवेत. तर 30 टक्के लोकांनी सचिन पायलट यांना पसंती दिली आहे. यातही विशेष म्हणजे, तब्बल 23 टक्के लोकांनी दोहोंपैकी कुणालाही समर्थन दिले नाही. तर 6 टक्के लोकांनी उत्तर माहीत नाही असे सांगितले.

खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. हायकमांडसोबत झालेल्या गेहलोत आणि पायलट यांच्या बैठकीनंतर, दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासंदर्भात दावे केले जात आहेत. नुकतेच काँग्रेसने राजस्थानात होणाऱ्या विधानसभा नुवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक समितीची घोषणा केली होती.

काँग्रेसने, मुख्यमत्री गेहलोत यांचे सर्वात जास्त विश्वासू नेते गोविंद सिंह डोटासरा यांना या समितीचे अध्यक्ष बनवले आहे. तर सचिन पायलट आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटElectionनिवडणूकcongressकाँग्रेस