शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 12:44 IST

Amreena Bhat : काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला.

गेल्या बुधवारी काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीना भट (Amreena Bhat) ची गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी अमरीनाचा १० वर्षीय भाचाही जखमी झाला होता. अमरीना भट व्यवसायाने टीव्ही अभिनेत्री आणि यूट्यूबर होती. ती काश्मीरमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. बुधवारी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हा दुसरा हल्ला होता. ज्यात टार्गेट किलिंग केलं गेलं. 

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात अमरीना गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुदैवाने या हल्ल्यातून तिच्या परिवारातील लोक सुरक्षित वाचले. त्यानंतर सेना आणि पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

अमरीना भट अभिनेत्री असण्यासोबतच काश्मीरी फोक सिंगरही होती. अभिनेत्री म्हणून तिने अनेक लोकल काश्मीरी शोज केले होते. अमरीनाचे काश्मीरी फोक सॉंग गाजले होते. अमरीना टिकटॉकवरही खूप प्रसिद्ध होती. त्यासोबतच ती YouTube Shorts आणि Instagram Reels सुद्धा बनवत होती. सोशल मीडियावर ती तिचे व्हिडीओ शेअर करत होत. 

अमरीना भटचं एक यूट्यूब चॅनलही आहे. ज्याचं नाव Amreena bhat official आहे. या चॅनलला साधारण १५.१ के सब्सक्राइबर्सही आहेत. तिने तिचे २२ व्हिडीओ अपलोड केले आहेत. अमरीनाने २० मे रोजी एक ड्रामा व्हिडीओ अपलोड केला होता. ज्याला ४३, ६९६ व्ह्यूज मिळाले. 

अमरीना भटचं काश्मीरी फोक सॉंग 'Balan Cheye' सुपर-डुपर हिट होतं. हे यूट्यूब वर टॉप ट्रेंडिंगमध्ये होतं. या गाण्याने अमरीनाला काश्मीरमध्ये खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यासोबतच अमीरनाचं 'Rinda Ho' सॉन्गही हिट झालं होतं.याआधी मंगळवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या सौरा भागात पोलीस कॉन्स्टेबल सैफुल्ला कादरीची त्याच्या घरात घुसून हत्या केली होती. त्यावेळी कॉन्स्टेबल कादरी त्याच्या मुलीला ट्यूशनला सोडण्यासाठी जात होता. यावेळी त्यांची ७ वर्षीय मुलगी जखमी झाली.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCrime Newsगुन्हेगारी