शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Hijab controversy: कोण आहे हिजाब घातलेली ती तरुणी? जिला घेरून करण्यात आली घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 09:05 IST

Karnataka Hijab controversy: कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेल्या एका तरुणीसमोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीनेही प्रत्युत्तरदाखल घोषणा दिल्या. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकमधील एका कॉलेजमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. जिथे मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिथे असलेला जमाव या तरुणीच्या दिशेने येतो. त्यानंतर या तरुणीच्या समोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीही प्रत्युत्तरदाखल घोषणा देताना दिसते. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे.

या तरुणीचं नाव मुस्कान आहे. तिने सांगितले की, मी कॉलेजमध्ये असाइनमेंटसाठी आले होते. तिथे असलेला तरुणांचा गट मला जाऊ देत नव्हता. कारण मी बुरखा परिधान केला होता. ते मला बुरखा हटवून आत जाण्यास सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी  घोषणा देण्यास सुरुवात केली. यामधील अनेकजण हे कॉलेजमधील होते. तर काहीजण बाहेरून आलेले होते.

त्यांनी जेव्हा घोषणाबाजी केली. तेव्हा प्रत्युत्तरदाखल मीसुद्धा घोषणा दिल्या. माझे शिक्षक आणि प्राचार्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी मला तिथून सुरक्षितपणे नेले. या गर्दीतील तरुण सांगत होते की, जर तिने बुरखा हटवला नाही तर तेसुद्धा भगवी शाल हटवणार नाही. त्यांच्याकडून सातत्याने मला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

दरम्यान, याबाबत कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी सांगितले की, काही लोकांकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना वाटते की, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेत गणवेशामध्येच आले पाहिजे. त्या प्रकरणामध्ये राजकारणाशी संबंधित काही लोकांचा सहभाग आहे.

सध्या कर्नाटकमधील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावरून वाद सुरू आहे. एकीकडे मुस्लिम विद्यार्थिनी शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून आपला विरोध नोंदवत आहेत. तर विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून आपला विरोध नोंदवत आहेत. हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. कर्नाटक सरकारने राज्यात कर्नाटका एज्युकेशन अॅक्ट-१९८३ चे कलम १३३ लागू केले आहे. त्यानुसार कर्नाटकातील शाळांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. तेव्हापासूनच या वादाला तोंड फुटले आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकStudentविद्यार्थीEducationशिक्षण