शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 23:07 IST

रूपनगर येथील रहिवासी जसबीर सिंगवर पाकिस्तानी गुप्तहेर एजंट शाकीर उर्फ ​​जट्ट रंधावाशी संबंध असल्याचा आरोप आहे, जो हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे

नवी दिल्ली - पंजाबमधून अटकेत असलेला गुप्तहेर जसबीर सिंगने तपास यंत्रणांच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. भारतात सुरू असलेल्या गुप्तहेर नेटवर्कचा मास्टरमाईंड पाकिस्तान पोलिसमधील माजी उपनिरिक्षक नासिर ढिल्लो आहे. ढिल्लो आता व्यवसायने पाकिस्तानी युट्यूबर आहे परंतु भारताविरोधात गुप्त कारवाया करण्यासाठी तो नेटवर्कमधून काम करत असतो. 

माहितीनुसार, नासिर ढिल्लो यानेच जसबीर सिंगची भेट पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकाऱ्यांसोबत लाहोर येथे करून दिली. इतकेच नाही तर ढिल्लोने जसबीरची भेट भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्राशी करून दिली होती. जी लाहोरमध्ये जसबीरसोबत जवळपास १० दिवस थांबली होती. नासिर ढिल्लो भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या युट्यूब क्रिएटर्सला दानिश नावाच्या व्यक्तीसोबत जोडतो, दानिश पुढे या लोकांना हेरगिरीचे टास्क सोपवतो आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पाहुणे म्हणून आमंत्रित करत होता. 

पाकिस्तान पोलिसांचे शेकडो माजी कर्मचारी या हेरगिरी रॅकेटचा हिस्सा असण्याची शक्यता आहे. हे लोक सोशल मिडिया, युट्यूब आणि वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून भारतीयांना अडकवतात. त्यांच्याकडून भारतातील संवेदनशील माहिती मिळवून देतात. आता सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर नासिर ढिल्लो, दानिश, ज्योती मल्होत्रा आले आहेत त्यातून या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेणे सुरू झाले आहे. 

दरम्यान, रूपनगर येथील रहिवासी जसबीर सिंगवर पाकिस्तानी गुप्तहेर एजंट शाकीर उर्फ ​​जट्ट रंधावाशी संबंध असल्याचा आरोप आहे, जो हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे. जसबीरचे हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश यांच्याशी जवळचे संबंध होते.जसबीर सिंग दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी झाला होता, जिथे तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सना भेटला. जसबीरन २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक पाकिस्तानी फोन नंबर सापडले आहेत. तपास यंत्रणा जसबीरची चौकशी करत आहेत त्यातून विविध खुलासे समोर आलेत. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने या पीआयओंशी केलेल्या त्याच्या सर्व संवादातील कंटेन्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो समोर येऊ नये अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJyoti Malhotraज्योती मल्होत्रा