शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? ‘मराठी माणूस’ ठरवणार! रविवारी सस्पेन्स संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 08:46 IST

भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांची झाली नियुक्ती, तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे. 

संजय शर्मानवी दिल्ली :  मध्य प्रदेश, राजस्थानछत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स रविवारी संपणार आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नवीन नेत्याचे नाव निवडले जाईल. तीन राज्यांमध्ये रविवारपर्यंत मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित होईल.

भाजपने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. राजस्थानमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यसभा सदस्य सरोज पांडे व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण व भाजप राष्ट्रीय सचिव आशा लाकडा निरीक्षक असतील. छत्तीसगडमध्ये केंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनोवाल व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांची नियुक्ती केली आहे. 

मिझोराम मुख्यमंत्रिपदी लालदुहोमा विराजमानआयझॉल : झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते ७३ वर्षीय लालदुहोमा यांनी शुक्रवारी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झेडपीएमच्या अन्य ११ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते लालदुहोमा यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभेत मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्री असू शकतात. के. सपडांगा यांना गृहमंत्री बनवण्यात आले तर लालरिनपुई या मिझोराममधील पहिल्या महिला कॅबिनेटमंत्री बनल्या.

शिवराज सिंह चौहान यांचा पत्ता कट?राजस्थानमध्ये वसुंधरा राजे वगळता इतर सर्व नेत्यांना दावेदार मानले जात आहे. गजेंद्र सिंह शेखावत, ओम माथूर यांच्यापासून ओम बिरला आणि अर्जुन मेघवाल यांच्यापर्यंत नावांची चर्चा होत आहे. तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे. 

ज्योतिरादित्य सिंधिया यांना संधी?मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी  निर्णय झालेला नाही. नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु मागील २ दिवसांत ज्योतिरादित्य सिंधिया यांची जे. पी. नड्डा यांनी दोन वेळा भेट घेतली. त्यानंतर त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.

छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री?छत्तीसगडमध्ये दोन आदिवासी महिलांची नावे समोर येत आहेत. यात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या रेणुका सिंह व लता उसेंडी यांच्या नावाची चर्चा आहे. या राज्यात भाजप नेतृत्व आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करू शकते. तसेच दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान