शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत कोण आहेत? रोजच टीका करणाऱ्यांना महत्व देत नाही; फडणवीसांचा खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:54 IST

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

नवी दिल्ली-

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा म्हणजे भाजपाची २०२४ च्या निवडणुकीची तयारी असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी कोण संजय राऊत? रोजच टीका करणाऱ्यांना मी महत्व देत नाही, असा टोला लगावला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. 

"संजय राऊत रोजच टीका करत असतात. त्यांना आम्ही महत्व देत नाही. ते कोण आहेत एवढे? ते काही महत्वाचे व्यक्ती नाहीत. त्यांच्या प्रश्नांना मी का उत्तर देऊ? तुमच्याकडे काही स्वत:चे प्रश्न असतील तर विचारा. त्यावर मी बोलेन", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार दिला. 

"ज्ञानवापीचा विषय आस्थेचा विषय आहे आणि असे विषय राजकारणाच्या पलीकडचे असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जातात. आज न्यायालयनं त्याठिकाणी कोर्ट-कमिश्नरची नियुक्ती केली आहे. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्याआधारे कोर्ट निर्णय देईल. तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. सध्या न्यायालयात हे प्रकरण असल्यानं त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही", असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?"खरंतर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी. अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यावर आता अशाप्रकारचे प्रश्न सामोपचाराने सुटले पाहिजेत. पण ताजमहालच्या खाली काय आहे? जामा मशिदीच्या खाली काय आहे? यातच सगळा वेळ चालला आहे. पण महागाईवर कुणी बोलत नाही. बेरोजगारीवर कुणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर आणि नावं बदलणं यावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्ञानवापी मशिदीचा वाद म्हणजे २०२४ च्या निवडणुकीची तयारी तर नाही ना? मशिदीत खोदकाम करण्यापेक्षा कैलास मानस पर्वत मिळवा", असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMosqueमशिदGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद