शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘अहिरां’च्या गडात कोणाला अहेर? AAP च्या सीएमपदाच्या गढवींना कोणाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:52 IST

‘आप’चे सीएम पदाचे उमेदवार रिंगणात; काँग्रेस जागा वाचवणार?

कमलेश वानखेडे

खंबाडिया( द्वारका) :  आम आदमी पार्टीने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलेले पत्रकार इसुदान गढवी हे द्वारका जिल्ह्यातील खंबाडिया या मतदारसंघात झाडू घेऊन उतरले आहेत. सुमारे दोन दशके भाजपचा गड राहिलेला हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकला. अहिर समाजाचे एकतर्फी प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी गढवी समाजातून येणाऱ्या इसुदान यांना बरीच कसरत करावी लागत आहे.

या मतदारसंघात १९७२ पासून अहिर समाजाचा उमेदवारच जिंकत आला आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अहिर समाजालाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार विक्रम माडम यांना तिकीट दिले. यापूर्वी ते खासदार म्हणूनही विजयी झाले होते. भाजपने येथे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले मुळुभाई बेरा यांना संधी दिली आहे. बेरा हे यापूर्वी दोनदा पराभूत झालेले आहेत.सौराष्ट्रच्या इतर जागांच्या तुलनेत या जागेवर भाजप कमजोर दिसत आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार इसुदान गढवी हे शेतकऱ्यांमध्ये व ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहेत. पत्रकार म्हणून त्यांनी उचललेले प्रश्न आजही जनतेच्या स्मरणात आहेत. त्यांच्या पाठीशी गडवी समाज भक्कमपणे उभा आहे. खंबालियाजवळील सलाया बंदर व भानवद तालुका या मुस्लिमबहुल भागात ते काँग्रेसच्या व्होट बँकला हात घालत आहेत. या भागातील तरुण मतदारही बऱ्यापैकी इसुदान यांच्याकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे येथे काँग्रेसचे माडम यांच्याशी त्यांची ‘टफ फाइट’ आहे.

‘खाटला’ मीटिंगवर भर nया मतदारसंघात राजकीय पारा चढलेला आहे. भाजपचा उघड व जोरात प्रचार सुरू आहे. आप व काँग्रेसने मात्र ‘खाटला’ मीटिंगवर भर दिला आहे. nदोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते गावागावांत जाऊन एखाद्या घरी गावकऱ्यांची छोटी मीटिंग घेऊन त्यांना आपले मुद्दे पटवून देत आहेत.

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022AAPआपElectionनिवडणूक