शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये एनडीएचा चेहरा कोण? घटक पक्षांमध्ये सुरू झाली धुसफूस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:03 IST

2019 साली होणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय पक्षांमध्ये शह आणि काटशहाचे खेळही सुरू झाले आहेत.

नवी दिल्ली - 2019 साली होणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय पक्षांमध्ये शह आणि काटशहाचे खेळही सुरू झाले आहेत. एकीकडे मोदींविरोधात विरोधकांची एकजूट उभी राहत असतानाच एनडीएमधील घटक पक्षांना सोबत ठेवण्याचा आव्हान भाजपासमोर आहे. त्यातच भाजपाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या बिहारमध्ये 2019 च्या निवडणुकीत एनडीएचा चेहरा कोण असेल यावरून घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे भाजापचे मित्रपक्ष आपली उपयुक्तता सिद्ध करून आघाडीमध्ये अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. गुरुवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीपूर्वीच जेडीयूने बिहारमध्ये नितीश कुमार हेच एनडीएचा चेहरा असतील अशी केलेली घोषणा ही त्याचाच एक भाग आहे. आता 2014 साली मोदींचा चेहरा पुढे करून बिहारमध्ये निवडणुकीस सामोरी जाणारी भाजपा जेडीयूच्या या प्रस्तावाला स्वीकारणार का हा सवालच आहे.   दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएमधील अजून एक महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टीने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार नव्हे तर नरेंद्र मोदीच एनडीएचा चेहरा असतील, असे स्पष्ट केले आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या या भूमिकेमुळे बिहारमध्ये एनडीएच्या घटक पक्षांमध्येच आघाडीवरून खडाखडी होण्याची शक्यता बळावली आहे. लोकसभेच्या 40 जागा असलेल्या बिहारमध्ये जेडीयूला एनडीएत मोठ्या भावाचे स्थान हवे आहे.  तसेच त्यांनी त्या दृष्टीने दावेदारी करून भाजपाला आपले म्हणणे मान्य करण्यास भाग पाडण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी 2019 साली बिहारमध्ये नरेद्र मोदीच चेहरा असतील, असे सांगून तिढा वाढवला आहे.   

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार