शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:09 IST

Bihar election result news: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये NDA ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक भूमिका आहे.

लालू प्रसाद यादवांच्या भावकीतील वाद आणि नितीशकुमार यांच्या महिलांसाठीच्या योजना यामुळे एनडीएने हे घवघवीत यश संपादन केल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये NDA ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक भूमिका आहे. यातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दारूबंदी आणि 'जीविका दीदी' योजनांमुळे महिला मतदारांनी NDA ला एकतर्फी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. 

एकूण मतदानापैकी पुरुषांपेक्षा सुमारे १०% अधिक मतदान महिलांनी केले होते. हा आकडा महिला मतदान: ७१.६%, पुरुष मतदान: ६२.८% असा होता. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच एक्झिट पोल आणि आता मतमोजणीचे आकडे स्पष्टपणे नितीश कुमार लाडके ठरल्याचे दर्शवत होते. यंदाच्या निवडणुकीत महिलांनी विक्रमी मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत जवळपास १० टक्क्यांनी अधिक मतदान करून या 'अर्ध्या लोकसंख्येने' राजकारणाचा संपूर्ण नकाशा बदलला आहे. 

दारूबंदीचा ऐतिहासिक निर्णय ठरला गेमचेंजरनितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्याचा घेतलेला निर्णय महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. दारूमुळे होणारा कौटुंबिक त्रास, आर्थिक नुकसान आणि हिंसाचार थांबल्यामुळे महिलावर्गाने मोठ्या संख्येने नितीश कुमारांच्या बाजूने मतदान केले. हा निर्णय महिला मतदारांमध्ये नितीश कुमारांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण ठरला.

'जीविका दीदी' योजनेची जादूनिवडणुकीपूर्वी नितीश सरकारने 'जीविका दीदी' योजनेअंतर्गत सुमारे १.३० कोटी महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले होते. स्वयंसहाय्यता समूहांना बळ देणाऱ्या या योजनेने थेट महिलांच्या हातात पैसा दिला. या आर्थिक पाठिंब्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले, ज्याचा फायदा NDA ला झाला.

जुन्या योजनांची भक्कम साथ२००६ मध्ये सुरू केलेली 'मुख्यमंत्री बालिका सायकल योजना' आणि शालेय गणवेश योजना यांसारख्या जुन्या योजनांनी देखील महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या दीर्घकालीन योजनांमुळे नितीश कुमारांची प्रतिमा महिलांच्या प्रगतीसाठी काम करणारा नेता अशी कायम राहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: Women Voters Changed the Game, Outnumbering Men

Web Summary : Nitish Kumar's focus on women, through initiatives like alcohol ban and 'Jivika Didi,' secured NDA's victory in Bihar. Women's turnout surpassed men by nearly 10%, reshaping the political landscape.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Biharबिहार