कुजबूज शेवटची

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:23+5:302015-03-06T23:07:23+5:30

मंत्री व साडेतीन कोटी

Whistle last | कुजबूज शेवटची

कुजबूज शेवटची

त्री व साडेतीन कोटी
कुठ्ठाळीच्या आमदार तथा वनमंत्री एलिना साल्ढाणा या खूप दुखावलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पर्वरीत झालेल्या भाजपच्या बैठकीवेळी साल्ढाणा यांचा वाढदिवस होता. तथापि, त्याच दिवशी भाजपच्या एका पदाधिकार्‍याने मंत्री साल्ढाणा यांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिल्याने मॅडम दुखावलेल्याच आहेत. त्या सध्या भाजपच्या कुठच्याच बैठकीत भाग घेत नाहीत. सांकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघ मगो पक्षाला दिला गेल्याने साल्ढाणा संतापल्या होत्या. त्यात बैठकीत त्या आपल्या भावना व्यक्त करत असताना भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व नेत्यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावल्याने त्यांनी दु:ख मनात ठेवले आहे. गोव्याला खास दर्जा दिला जावा ही आपली मागणीही भाजपने व भाजपच्या केंद्र सरकारने गंभीरपणे घेतलेली नाही हे साल्ढाणा यांना कळाले आहे. तुम्ही जास्त बोलू नका, तुम्हाला अपक्ष निवडून आणण्यासाठी पार्टीला साडेतीन कोटी रुपयांचा खर्च आला असल्याचे विधान एका पदाधिकार्‍याने बैठकीत केले. ते साल्ढाणा यांच्या जिव्हारी लागल्याचे कळते.

Web Title: Whistle last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.