कुजबूज

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:05+5:302015-09-14T00:39:05+5:30

सोपो कंत्राटदाराची चांदी

Whisper | कुजबूज

कुजबूज

पो कंत्राटदाराची चांदी
म्हापशातील बाजार सध्या चतुर्थीच्या खरेदीसाठी फुलला आहे. त्यामुळे खरेदीदारांसह विक्रेत्यांचीही गर्दी बरीच वाढली आहे. विक्रेत्यांच्या कमाईचे हेच दिवस असतात. विक्रेत्यांकडून सोपो गोळा करण्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. हा सोपो गोळा करणार्‍या कंत्राटदाराची सध्या बरीच चांदी होत आहे. कंत्राटदाराची माणसे सोपो गोळा करताना योग्य पावती देत नाहीत. तसेच वेळेवर सोपो दिला नाही तर विक्रेत्यांना वाईट वागणूकही देतात. याचा अनुभव बर्‍याच विक्रेत्यांना या दिवसांत येत आहे.
-------------------------
भाजपकडून फसवणूक
उसकई-पालये पंचायतीच्या ग्रामसभेत घरप?ी वाढवण्याच्या मुद्द्यावरून येथील काही लोकांनी भाजपवर रविवारी बरीच टीका केली. सचिवाने घरप?ी वाढविण्यासंबंधीचा मुद्दा सभेत चर्चेसाठी मांडला, त्या वेळी काही नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. निवडणुकीवेळी भाजपने घरप?ी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सचिवांनी, आपणही याबाबत वर्तमानपत्रात वाचल्याचे सांगितले. मात्र, या संदर्भात सरकारकडून पंचायतीला अधिसूचना किंवा काहीच सूचना केली नसल्याने यासंबंधी आपण काही करू शकत नाही, असे म्हणाले. या उत्तरावर काही लोकांनी भाजपवर टीका केली. या पक्षाने लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही केला.
---------------------
ग्रामसभांत सरपंच ‘मौनी बाबा’
ग्रामसभेचा अध्यक्ष हा संबंधित पंचायतीचा सरपंच असतो. तोच सभा कशी चालवावी याची दक्षता घेतो; पण हल्लीच्या काळात पंचायतीचे सरपंच वारंवार बदलत असल्यामुळे ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून सरपंच हा केवळ नावापुरता राहिला आहे. तो फक्त अध्यक्षपदाचा हक्क सांगण्यासाठी खुर्चीवर बसतो. मात्र, सभेवर पूर्ण वर्चस्व सचिवाचे असते. तोच ही सभा अध्यक्षांमार्फत करवून घेत असतो. पंचायतीत काय घडते याची पूर्ण माहिती सरपंचाहून जास्त सचिवाला असते. त्यामुळे कदाचित सचिव जास्त चांगल्या प्रकारे माहिती लपवू शकत असल्यानेच हा प्रकार घडत असावा. याचे उदाहरण म्हणजे रविवारी उसकई पंचायतीची झालेली ग्रामसभा. या सभेत सरपंच फक्त नावापुरते खुर्चीवर बसले होते. सचिवांनीच सभा पार पाडली. गेल्या रविवारी थिवी ग्रामसभेतही असाच प्रकार घडला होता. इतर ग्रामसभांतही असे प्रकार बघायला मिळतात.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.