कुजबूज
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:21+5:302015-08-27T23:45:21+5:30
सरपंचांचा शोध

कुजबूज
स पंचांचा शोधनावेलीचे सरपंच फ्रॅँक फर्नांडिस असे म्हणाले की, नावेलीत सध्या पत्रकारांचा वावर वाढला आहे. त्यांच्या मते नावेलीत सध्या घटनाही वाढल्या असाव्यात म्हणून असे झाले असावे. फर्नांडिस यांनी नावेली पंचायतीत ऑनलाईन सुविधेचा प्रारंभ कार्यक्रमात आभार प्रदर्शनावेळी हे वक्तव्य केले. सरपंचांना पत्रकारांचा वावर वाढण्याविषयी माहिती असावी, हेही थोडके नसावे. फोटो लावून तयारी?मडगाव पालिकेने दारोदारी कचरा गोळा करण्याची मोहीम स्वयंसेवी गटामार्फत सुरू केली आहे. आता एका प्रभागात एकच नगरसेवक असतो; परंतु एकाच प्रभागात दारोदारी कचरा गोळा करून घेऊन जाणार्या एका रिक्षावर माजी नगराध्यक्ष व एका प्रभाग नगरसेविकांचा फोटो लावला आहे. प्रभाग एकच, पण माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविकेचा फोटो त्या रिक्षावर लावला आहे. नगरसेविकेने फोटो लावला हे समजून घेऊ; पण माजी नगराध्यक्षांचा फोटो का लावला, याचे कोडे मात्र सुटले नाही. कदाचित ही ऑक्टोबरमध्ये होणार्या निवडणुकीची पूर्वतयारी तरी नसावी ना?