कुजबूज
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:18+5:302015-08-14T22:54:18+5:30
राजकीय आजार?

कुजबूज
र जकीय आजार?प्रकरण अंगावर शेकते असे दिसल्यावर आजारपणाचे सोंग घेणे हा राजकारण्यांचा नेहमीचा डावपेच. मात्र, आता मडगाव पालिकेतही असे डावपेच खेळले जातात की काय अशी शंका सध्या मडगावचे नगरसेवकच घेत आहेत. मडगावात नवीन लक्ष्मण मुख्याधिकारी असताना त्यांनी पालिकेत वायफाय यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वागत कक्ष अशा काही सुधारणा केल्या होत्या. मात्र, हे करताना मडगाव पालिका मंडळाची परवानगी घेतली नव्हती किंवा कायदेशीर सोपस्कारही पूर्ण केले नव्हते. त्यामुळे आता या कामाची चौकशी करावी, अशी नगरसेवकांची मागणी आहे. शुक्रवारच्या बैठकीतही हा विषय चर्चेत आला. मात्र, संबंधित अधिकारी रजेवर असल्याने या विषयावर तांत्रिक विभागाकडून खुलासा मिळू शकला नाही. हा विषय मागच्याही बैठकीत आला होता; पण त्याही वेळी अधिकारी आजारी असल्याचे सांगून घरीच राहिले होते. वास्तविक हा अधिकारी योगपटू आहे. योग हा सर्व आजारांवर जालीम उपचार असे सांगितले जाते, तरीही हे अधिकारी वारंवार बैठकीच्याच दिवशी आजारी कसे पडतात?लॅपटॉपचे भाडे कोण देणार?एरव्ही 25 ते 30 हजार रुपयांत मिळणारे लॅपटॉप मडगाव पालिकेने नवीन लक्ष्मण मुख्याधिकारी असताना दरमहा सात हजार रुपये या भाड्यावर घेतले होते. एक नव्हे तर असे एकूण चार लॅपटॉप भाडेप?ीवर घेतले होते. मात्र, आता अशी गोष्ट उघडकीस आली आहे की यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केली नव्हती किंवा त्याला कायदेशीर मान्यताही मिळाली नव्हती. एरव्ही कायद्याचे रक्षक म्हणवणारे आणि पालिकेतील भ्रष्टाचाराला प्रतिबंध आणण्याच्या गोष्टी करणारे नवीन यांनी हा असा निर्णय कसा घेतला? सध्या या लॅपटॉपचे भाडे थकले आहे. आता ते कुणी फेडावे हा प्रश्न नगरसेवक करताहेत. मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्या या वादात तो बिचारा लॅपटॉप भाडेप?ीवर देणारा विनाकारण अडकला आहे.