‘त्या’ व्हिसलब्लोअरचे नाव जाहीर करावे
By Admin | Updated: September 14, 2014 02:05 IST2014-09-14T02:05:48+5:302014-09-14T02:05:48+5:30
यादी देणा:याचे नाव (व्हिसलब्लोअर) उघड करावे, अशी मागणी सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयासमक्ष दाखल प्रतिज्ञापत्रत केली आह़े

‘त्या’ व्हिसलब्लोअरचे नाव जाहीर करावे
नवी दिल्ली : सीबीआय संचालक रणजित सिन्हा घरातील ज्या अभ्यागत नोंदवहीतील यादीमुळे अडचणीत आलेत, मुळात ती यादी देणा:याचे नाव (व्हिसलब्लोअर) उघड करावे, अशी मागणी सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयासमक्ष दाखल प्रतिज्ञापत्रत केली आह़े
ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सिन्हांविरुद्ध याचिका दाखल केली आह़े सीबीआय तपास करीत असलेल्या 2 जी स्पेक्ट्रम तसेच अन्य घोटाळे प्रकरणातील आरोपींना रणजित सिन्हा यांनी भेट दिली़ तसेच ज्यांच्याविरुद्ध कोर्टात खटला सुरू आहे, अशा आरोपींनाही ते भेटले,
असा आरोप भूषण यांनी याचिकेत केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)